राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी )आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा महामंत्री संजय केनेकर यांनी केलेल्या माहूर दौऱ्यात बूथ सशक्तिकरण आढावा बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनात बूथ सशक्तीकरण हा निवडणुका जिंकण्याच्या आधारापैकी एक महत्वाचा आधार असल्याने त्यासाठी परिश्रम घेणे अनिवार्य असल्याचा सल्ला दिला.
लोकसभा प्रवास दौऱ्याचे अनुषंगाने जिल्ह्यातील विविध तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बूथ सशक्तिकरण आढावा बैठकी सुरु आहेत. त्यानिमित्ताने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा महामंत्री संजय केनेकर यांनी दि.11 एप्रिल रोजी दु.12 वा.स्थानिक गोपीनाथगड तालुका कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांची बूथ
सशक्तीकरणा संदर्भात आढावा बैठक घेतली.त्यात सरल ऍप, वॉट्सअप गृप तयार करणे, बूथ सशक्तीकरण करणे, नवीन मतदार नोंदणी करणे,समाज माध्यमाच्या कामाला गती देणे तसेच 4 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय सप्ताह साजरा करणे, केंद्र व राज्य सरकारच्या जनपयोगी योजनाची सर्वसामान्य नागरिकांना माहिती करून देणे, त्याचा त्यांना लाभ मिळवून देणे, महापुरुषांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविणे आदी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन करून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा आढावा घेतला.आपल्या अध्यक्षीय समारोपातून किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम यांनी महामंत्र्यांनी केलेले आवाहन व मार्गदर्शना नुसार आगामी काळात पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परिश्रम घेऊन कार्य करण्याची खात्री दिली.बैठकीला जिल्हा चिटणीस डॉ. माधव पाटील उचेकर, ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम, चंद्रकांत पवार, तालुकाध्यक्ष ऍड. दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष सागर महामुने, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे, बूथ संयोजक जिवन अग्रवाल, माजी जि. प.सदस्य प्रकाश पाटील,नंदकुमार जोशी, सोशल मीडिया तालुका संयोजक हर्षदीप दीक्षित, दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष शंकर कांबळे, संतोष तामखाने,अशोक जोशी, कैलाश फड, आनंदराव कुडमेते, विजय आमले,प्रतिभा पाटील भुसारे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे, रंजना पाटील, पद्मा गिऱ्हे, निर्मला जोशी, प्रतिभा पाटील, अनिता कुमरे आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक ऍड. दिनेश येऊतकर यांनी केले.सूत्रसंचलन नागोराव सुर्वे यांनी केले,तर उचेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

COMMENTS