मान्सूनपूर्व उपाययोजनेबाबत संबंधित विभागाने सतर्क राहून कामे करावीत - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  नांदेड दि.   24   :-   भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरात अनिनो समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा आपल्या दे...

 

नांदेड दि. 24 :- भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरात अनिनो समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा आपल्या देशातील मान्सूम हवामान पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात येत्या काळात पाणी टंचाई भासू नये यादृष्टीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्देश दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. याबैठकीत विभागनिहाय आढावा घेतांना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना निर्देश केल्या. पाटबंधारे विभागाचे अधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंताविजवितरण कंपनीचे अधिकारीआरोग्य विभागाचे अधिकारीनगर पालिका प्रशासनउपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

   

उन्हाळयात नागरी भागात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. ग्रामीण भागातही पाणी पुरवठाबाबतचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला. पाण्याच्या अवैध उपसावर नियंत्रण करुन वेळ पडल्यास टॅकरची व्यवस्था करण्यात यावी. पाण्याचे आराखडे तयार करावेत. तसेच याशिवाय आवश्यकता भासल्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन रोजगार विभागानी करावे. पिण्याच्या पाण्यासाठी रेन हार्वेस्टिंगजलयुक्त शिवारजलसिंचनअटल भूजल आदी योजना मिशन मोडवर अभियान स्वरुपात राबवाव्यात. जलजीवन मिशनमध्ये जी कामे अपूर्ण आहेत ती जलद गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला दिल्या. तसेच उन्हाळयात वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाणवठेजलपात्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या.

 

या बैठकीत जुलै ते ऑगस्ट महिन्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा कृती आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यातील गोदावरीसह पैनगंगा, आसना, मन्याड, पुर्णा आदी नद्या आणि पाझर तलाव यांची संख्या लक्षात घेता दरवर्षी मान्सूम पूर्व कामाच्या नियोजनात प्रत्येक विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये लहान-मोठे पाझर तलाव यांची संख्याही अधिक आहे. हे तलाव अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास अधिक सुस्थितीत व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने सर्व संबंधित विभागाने अधिक दक्षता घेतली पाहिजे. छोटया नदी नाले यांना थोडया वेळात पूर येतात यावेळी विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक गावात अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन आराखडा 1 मे रोजी ग्रामसभेत मांडण्यात यावा.

 

रस्त्याचेपुलाचे ऑडीट करुन आपत्तीच्या परिस्थितीत वाहतूक विस्कळीत होणार नाही यांची काळजी घ्यावी असे निर्देश संबंधित विभागाना दिले. पावसाळयात औषधाच्या उपलब्धतेबाबत आरोग्य विभागाने माहिती सादर केली. तसेच आरोग्य विभागाला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास औषधे पुरवठा आवश्यक तेवढा ठेवण्याबाबतच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच विद्युत विज वितरण कंपनीने नागरिकांची गैरसोय होवू नये यांची काळजी घ्यावी.  सर्व तहसिलदारकृषी अधिकारी यांनी अवर्षण किंवा अतिवृष्टी काळात दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group