नांदेड ( प्रतिनिधी), दिनांक:25 मार्च 2023, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत कुसुमताई चव्हाण डी.एड.काॅलेजमध्ये नुक्तेच तीन दिवसीय शिक्...
नांदेड ( प्रतिनिधी), दिनांक:25 मार्च 2023, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत कुसुमताई चव्हाण डी.एड.काॅलेजमध्ये नुक्तेच तीन दिवसीय शिक्षक व्यक्तिमत्व शिबिर क्रंमाक एक उत्साहात संपन्न झाले . ( 13मार्च ते 15 मार्च 2023) शिबिराची सुरुवात शैक्षणिक सहल/ क्षेत्रभेटीने झाली.ही शैक्षणिक सहल भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव- येळगाव ता.अर्धापूर,जि.नांदेड, भाऊराव चव्हाण हायस्कूल नांदेड व वारंगाफाटा येथील महादेव मंदीर, तुळजाभवानी मंदीर व उद्यान जि. हिंगोली या स्थळांना भेटी देण्यात आल्या . साखर निर्मिती कशी होते व उद्यानानातील विविध झांडांची माहिती जाणून घेण्यात आली.सदरील सहल परिणामकारक पार पडली.
शिबिराचा दुसरा दिवस ' जागतिक विज्ञान,(28फेब्रुवारी), जागतिक महिला (8 मार्च)व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृति दिन (10 मार्च) औचित्य साधून छाञाध्यापकांचा विविध गुण सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डाॅ.ए. आर. राऊत , प्रमुख व्याख्यात्या डाॅ. सत्यभामा जाधव, डाॅ.अंबोरे एम.एन.व प्रा.भोस्कर जे. ए.यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ एम.एन.अंबोरे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शब्दसुमनाने झैनम महेविश व बुशरा पठान यांनी केले. प्रारंभी विद्यादेवी सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेरा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रमुख व्याख्यात्या डाॅ. सत्यभामा जाधव म्हणाल्या की, जागतिक महिला दिन हा महिलांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा व आनंदाचा आहे दिवस आहे.कारण या रोजी स्ञीच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. परंतु शंबर टक्के स्ञी सक्षम आहे का ? हा प्रश्न स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षातही पडतो.स्ञीकडे एक माणूस म्हणून पाहणे आवश्यक आहे. राजकारणात महिलांचा सक्रीय सहभाग वाढला पाहिजे. आयुष्य सन्मानाने जगण्याचा स्ञीला स्वातंत्र्य आहे.नव्हे संविधानाने दिलेला तो अधिकार आहे.यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रथम व द्वितीय वर्षातील इंग्रजी व मराठी माध्यमातील छात्राध्यापकांनी विविध गुण सादरीकरण केले. यामध्ये, सायमा नुरेन, सुरज घंटेवाड,गौरी हाटकर,समीक्षा गोकुळे, युनस अन्सारी, भूमिका भालेराव, जगदीश भुक्तरे, आसना शेख, शीतल आरसुळे, धनश्री आढाव, मुस्कान शेख, मनप्रित कौर, आसमा शालेहीन , तैरीन बेगम, झैनब महेविश, सानिका कु- हाडे, साक्षी माधववाड आदी छात्राध्यापकांनी भाषण, गीत,एकांकिका, भित्तीप्रञक आदींचे सादरीकरण केले.सूञसंचालन सायमा नुरेन व सोयब फुरकान यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य मार्गदर्शन प्राचार्या डाॅ ए.आर. राऊत, डाॅ. एम.एन.अंबोरे, प्रा. भोस्कर जे. ए., प्रा.म.अल्ताफ , प्रा.सरोदे यु.जी.व प्रा. यु.एम.यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय आंतरवासिता गट क्रमांक चार ने परिश्रम घेतले .तर शैक्षणिक सहलीचे नेतृत्त्व विभाग प्रमुख डाॅ. आर.डब्ल्यू. नवघडे, प्रा.महमद अल्ताफ, प्रा.भोस्कर जे.ए. व प्रा.डी.व्ही.चिद्दरवार यांनी केले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना , कार्यकारी संचालक मा.एस.आर.पाटील, मा.सुरक्षा अधिकारी श्यामकुमार सर, देवीदास गंगातीर, श्री. उत्तम पुंडगे यांनी कार्यलयीन सहकार्य केले.श्री. पी यु शिंदे यांनी साखर कारखान्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे भाऊराव चव्हाण हायस्कूल येथील सहशिक्षक श्री. एस.जी.मोरे व श्री. एम.टी.भांडारकर यांचेही सहकार्य लाभले.शिबीराचा समारोप तिस-या दिवशी मा.प्राचार्या डाॅ. ए. आर.राऊत , डाॅ.आर.डब्ल्यू. नवघडे, डाॅ.एम.एन.अंबोरे व प्रा.जे.ए.भोस्कर अध्यक्ष व प्रमुख उपस्थितीत पार पडला. या रोजी प्रा.एन.पी.लोंखडे,प्रा. यु जी.सरोदे आदी प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांपैकी मुस्कान शेख, सायमा नुरेन, तेजस्विनी फालके, सुरज घंटेवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. जे.एस.पावडे, प्रा. डी.व्ही. चिद्दरवार आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व छाञाध्यापकांची बहुसंख्येने उपस्थिती होती..

COMMENTS