भेंडेगाव शिवारात ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी विशेष पथकाकडुन जागेची पाहणी खासदार हेमंत पाटील यांची माहिती

  हिंगोली ,  दि.२४(प्रतिनिधी)  ः हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मागील वर्षी जिल्ह्यातील भेंडेगाव शिवारात हळद पिकावर प्...

 


हिंगोलीदि.२४(प्रतिनिधी) ः हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मागील वर्षी जिल्ह्यातील भेंडेगाव शिवारात हळद पिकावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने ड्रायपोर्ट उभारला जावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारातील गायरान जमीन गट क्रमांक ११८ वरील १०० हेक्टर जागेवर हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली भूनिवड समितीच्या विशेष पथकाने जागेची पाहणी केली असल्याची  खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली.  

हळद उत्पादनात हिंगोली जिल्हा सर्वात अग्रेसर असल्याने दळण वळणाच्या सोईनुसार प्रक्रिया केलेली हळद देशभरात सहज पोहचविता येईल या दृष्टीने भेंडेगाव शिवारातच हाळदिचे ड्रायपोर्ट उभारले जावे अशी  खासदार मी यापूर्वी उद्योगमंत्री यांच्याकडे ३ आक्टोबर २०२२ रोजी मागणी केली होती. मी केलेल्या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यांच्या दालनात बैठक घेत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भेडेंगाव शिवारातील मौजे. चोंडी (जुनोना) येथील गट क्रमांक ११८ येथील साधारण १५० एकर जमिनिवर ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी सरकारी आणि खासगी क्षेत्र सलगपणे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात गट निहाय गावांच्या नावाची यादी आणि गाव नकाशाची प्रत उपलब्ध करुन देण्याच्या वसमतच्या उप विभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने वसमत तालुक्यातील मौजे चोंडीसेंदुरसना (जुनोना रेल्वे स्टेशन) येथील सरकारच्या मालकीची १०. ४० टेक्टर आणि खासगी ८९. ६० अशी एकुण १०० हेक्टर आर जमिन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रादेशिक अधिकारीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंताउपरचनाकारउपविभागीय अधिकारीनायब तहसिलदार यांनी पाहणी करुन हे क्षेत्र पूर्णा ते आकोला (जुनोना रेल्वे स्टेशन) या मार्गावर स्थित असूनकोपरगाव (अहमदनगर) ते महागाव (यवतमाळ) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वर आहे. शिवाय ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्कला जवळच्या मौजे राजवड येथील तलावातुन कायमस्वरुपी पाणी पुरवठा करता येतो. तसेच अगदी ३५ किलो मिटरच्या अंतरावर सिध्देश्वर धरण आणि ५५ किलो मिटरच्या अंतरावर उर्ध्व पैनगंगा इसापुर प्रकल्प आहे. त्यामुळे भेंडेगाव शिवारात ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क उभारले जाईल अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group