धर्माबाद - कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून संपूर्ण सण उत्सव व जयंत्यावर मर्यादा आली होती. पण यावर्षी निर्बंध म...
धर्माबाद - कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून संपूर्ण सण उत्सव व जयंत्यावर मर्यादा आली होती. पण यावर्षी निर्बंध मुक्त वातावरणात सर्व जयंती सण- सोहळे साजरे करण्यात येत आहेत.
येता 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मोठ्या प्रमाणात तयारी सर्वत्र चालू असून आपापल्या परीने भीम जयंती मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी प्रगल्भ व्यक्तिमत्त्व असलेले उच्चशिक्षित तरुणांना या मंडळात स्थान देण्यात आले आहे. धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत असलेल्या मौजे. बाळापुर येथील भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कीर्तीराज गायकवाड तर कोषाध्यक्ष तथा मार्गदर्शक म्हणून प्रेम घाटे यांची एकमताने निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी अमोल जाधव, सचिव म्हणून राष्ट्रपाल घाटे, सहसचिव विठ्ठल वाघमारे, सहकोषाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, संघटक गंगाधर कोठारे ,सहसंघटक किशोर पहेलवान ,विजय साळवे तर सल्लागार म्हणून पत्रकार गंगाप्रसाद सोनकांबळे तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी सुधाकर जाधव यांची निवड करण्यात आली.


COMMENTS