मुंबई २३-(प्रतिनिधी)- समाजातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात कायम ठेवण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेणे ,शैक्षणिक साहित्य पुरविणे, युपीएससी एमपीएससीचे क्लासेस सुरू करणे व अभ्यासिका सुरू करणे आदी शैक्षणिक उपक्रम राबवून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती एक वही एक पेन अभियानच्या वतीने देण्यात आली आहे.
घरची परीस्थिती हलाखीची असतानाही महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नातून आपले शिक्षण घेतले अनेक पदव्या प्राप्त केल्या ते घटनाकार झाले विविध विषयांवर त्यांनी अनेक प्रबंध लिहून भारतीयांना दिशादर्शक मार्ग दाखविला. शिक्षणाचे मोल काय आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून सिध्द करून दाखवले त्यामुळे
त्यांना समाजाकडून अपेक्षित असणारे विविध शैक्षणिक उपक्रम राबवून यावेळची डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष पत्रकार राजू झनके यांनी दिली आहे. या जयंती दरम्यान मुंबईसह राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वितरण केले चाणार आहे
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल पासून महिनाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी होत असते या जयंतीवरील कार्यक्रमांची उलाढाल करोडोंच्या घरात जाते यावेळी मनोरंजन ,प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवले जातात,आकर्षक रोषणाई ,मिरवणूका निघतात.मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात, यासह अनेक अनावश्यक खर्च केले जातात , शिक्षणावर नितांत प्रेम असणा-या घटनाकारांसाठी अनावश्यक खर्च करणारी जयंती अपेक्षित नव्हती तर त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या मार्गावर काम करणे आवश्यक असून महाराष्ट्रासह देशविदेशातील जयंती उत्सव मंडळे समित्या व विविध सामाजिक संस्था राजकीय पक्षांनी याचा गंभीरपणे विचार करून जयंतीतील अनावश्यक खर्च टाळून समाजातील गुणी व गरजू विद्यार्थी दत्तक घेणे शैक्षणिक साहीत्य वितरण करणे गाव शहर तेथे अभ्यासिका व वाचनालये सुरु करणे , एमपीएससीचे क्लासेस चालविणे आदी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती साजरी करावी असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी यात सहकार्य व मदतीसाठी ९३७२३४३१०८ या भ्रमणध्वनीवर किंवा Zankeraju@gmail.com या ईमेलवर संपर्क व पत्रव्यवहार सूचना कराव्यात असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे

COMMENTS