परभणी ( )दिनांक 18 व 19 मार्च रोजी परभणी क्लब येथे खेलो मराठवाडा ओपन टेबल टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन इम्पॅक्चुअल ( Impactual ) मॅनेजमेंट, चेतनानंद टेबल टेनिस ट्रेनिंग सेंटर व परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या माध्यामातून करण्यात आले होते.
ह्या स्पर्धे मध्ये नांदेडच्या आमिष आठवले ने 17 वर्ष मुले व पुरुष गटात दुहेरी विजेतेपद मिळवले.
तसेच परभणी च्या शिवनंदन पुरी याने 13 वर्षाच्या गटात प्रथम, 17 वर्ष गटात द्वितीय व पुरुष गटात तृतीय पारितोषिक प्राप्त केले.
11 वर्ष वयोगटात नांदेडच्या राजरतन येंगडे याने प्रथम पारितोषिक मिळवले.
- स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे :
- 11 वर्ष मुले:
- प्रथम : राजरतन येंगडे
- द्वितीय : आलम सिद्धिकी
- तृतीय : शिवम डाख व अवैत मनीयार
- 13 वर्ष मुले:
- प्रथम : शिवनंदन पुरी
- द्वितीय : हुसैन पठाण
- तृतीय : रुद्र टाक व राजरतन येंगडे
- 17 वर्ष मुले :
- प्रथम : आमिष आठवले
- द्वितीय : शिवनंदन पुरी
- तृतीय : अनुज कौठेकर
- पुरुष गट :
- प्रथम : आमिष आठवले
- द्वितीय : अजिंक्य घन
- तृतीय : रोहित जोशी व शिवनंदन पुरी
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पूजा महेश बाहेती यांची उपस्थिती होत्या. तर कार्यक्रम चे अध्यक्षपदी गणेश माळवे, परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव , संजय मुंडे राज्य क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा संघटना परभणी , धंनजय भागवत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ,
उपस्थित होते.
या स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात यशस्वी रीतीने पार पडली. या स्पर्धेतील सर्व यशस्वी खेळाडूंना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले
स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू श्रेया फुरसुले , गौस खान पठाण यांची उपस्थित होती.
स्पर्धा यशस्वीतेसाठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक: चेतन मुक्तावार, अजिंक्य घन, विजय अवचार, निखिल झुटे, रोहीत जोशी, तुषार जाधव,सुरज भुजबळ, आदींनी परीश्रम घेतले.

COMMENTS