राम दातीर
माहूर( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माहूर तालुकाध्यक्ष पदी वसंत केशवराव कपाटे, कार्याध्यक्ष पदी नंदकुमार विश्वेश्वरराव जोशी तर शहराध्यक्ष पदी राजु रामचंद्र दराडे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक कपिलेश्वर धर्म शाळेच्या सभागृहात गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर अ. भा. म. पत्रकार संघाचे सदस्य राज ठाकूर, सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महंमद यांचे प्रमुख उपस्थितीत दु.1 वा.पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. वसंत कपाटे यांची तालुकाध्यक्षपदी, नंदकुमार जोशी यांची कार्याध्यक्षपदी तर राजु दराडे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी पत्रकार सुरेश गिऱ्हे, कार्तिक बेहेरे, विनोद भारती,संजय घोगरे,प्रशांत शिंदे, जयंत गिऱ्हे, पवन कोंडे, सचिन बेहेरे,राम दातीर आदी पत्रकारांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संजय घोगरे यांनी केले. सूत्रसंचलन पवन कोंडे यांनी तर प्रशांत शिंदे यांनी आभार मानले.
.jpg)
COMMENTS