राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षाच्या पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचे ) असतात. लहानपासून मोठ्यापर्यंत या महिन्यांमध्ये रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते.त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास)धरतात. अशाच प्रकारे माहूर येथील उद्योजक जुनेद दोसानी यांची ५ वर्षीय मुलगी आयात दोसानी या चिमुकली ने ही आपल्या जीवनातील पहिला रोजा आज शनिवार दिनांक २५ रोजी पूर्ण केला.
मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता ही उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रास होतो त्यात या पाच वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे आयात या ५ वर्षीय मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS