महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी बी आर एस कटिबद्ध ; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची ग्वाही

        लोहा,(प्रतिनिधी)         गेल्या ७५ वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास झाला नाही अनेक मंत्री झाले अनेक पंतप्रधान झाले पण या भाग...

 

      लोहा,(प्रतिनिधी) 
       गेल्या ७५ वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास झाला नाही अनेक मंत्री झाले अनेक पंतप्रधान झाले पण या भागातील विकास झाला नाही असे सांगून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न सोडून महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी बी आर एस कटिबद्ध असल्याची ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी लोहा येथे दिली.

  लोहा येथील बैल बाजार मैदानावर जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव बोलत होते. 
                    यावेळी व्यासपीठावर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, आमदार जिवन अण्णा रेड्डी,माजी आमदार हर्षवर्धन पाटील जाधव,आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश दादा गायकवाड,बंजारा नेते हरिभाऊ राठोड, अनुसूचित जमातीचे नेते नागनाथ घिसेवाड, यशपाल भिंगे, प्रविण जेठेवाड,जिपचे माजी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, दत्ता पवार, संजय कराळे यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
          तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे नांदेड विमानतळावरून हेलिकॅप्टरने लोहा येथे आल्यानंतर त्यांनी लोहा येथील विशाल जाहीर सभेस संबोधित केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील पहिली बी आर एस ची सभा नांदेड येथे संपन्न झाली.यामुळे महाराष्ट्रातील सरकारच्या पोटात पोटसूळ उठले.आमचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मोफत करण्यात यावा, तसेच प्रति एकरी दहा हजार रुपये देण्यात यावेत,शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न राज्यातील सरकारने सोडवावीत, मी महाराष्ट्रात येणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे नाव घेऊन त्यांनी टीका केली.महाराष्ट्राचा विकास झाला आमच्या मागण्या मान्य झाल्या तर मी येणार नाही आणि विकास जर झाला नाही तर जरूर मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी संघर्ष करेल असे ते म्हणाले. 
         जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. बसवेश्वर,महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. यानंतर आयोजित सभेस संबोधित करताना त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीस वंदन करून त्यांनी भाषणात सुरुवात केली. तेलंगणातील विकासाचे मॉडेल महाराष्ट्रामध्ये मी आणणार आहे असे सांगून त्यांनी दहा हजार रुपये प्रति एकर शेतकऱ्यांना दिले पाहिजे.२४ घंटे उच्च गुणवत्ता वीज शेतकऱ्यांना मोफत द्यावी,शेतकऱ्यांच्या शेतीला प्रकल्पातून मोफत पाणी द्यावे.ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपयाचा विमा द्यावा असे सांगून महाराष्ट्र सरकारने या मागण्या मान्य केल्या तर मी महाराष्ट्रात येणार नाही. अन्यथा महाराष्ट्रात येऊन तेलंगणा मॉडेलच्या धर्तीवर विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
           देशाची ५४ वर्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली. यानंतर १६ वर्ष भाजपाचे हाती सत्ता आहे, पण शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ७५ हजार टीएमसी पाणी नदीतून वाहते. यापैकी एकोणीस हजार टीएमसी पाणी बंगालच्या उपसागरात वाहून जाते या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला होत नाही असे सांगून त्यांनी सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी तेलंगणाच्या धरतीवर आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. हिंदुस्तान सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे फक्त या भागातील जनतेने साथ द्यावी. आम्ही विकास करू असे ते यावेळी म्हणाले. देशात १२५ वर्ष वीज पुरवठा करण्यासाठी कोळसा आहे पण याचा उपयोग होत नाही. उच्च वाहिनेद्वारे वीज पुरवठा केला पाहिजे महाराष्ट्रातील दलितांना दहा लाख रुपये अनुदान व्यवसायासाठी आमचे सरकार देणार आहे,तेलंगणात आम्ही हा पॅटर्न राबवितो.यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतो ही खेदाची बाब असून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आमच्या सरकारच्या पाठीमागे रहा, आम्ही विकास करू जाती धर्माच्या नावावर राजकारण सोडून शेतकऱ्यासाठी एकजूट व्हा असा सल्ला त्यांनी उपस्थित जाहीर सभेत दिला.राज्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बीआरएस उमेदवार उभे करणार असून एक वेळेस संधी द्या संधीचे सोने करून दाखवू असेही ते म्हणाले. 
        या सभेस जवळपास ७० हजाराच्या वर जनसमुदाय उपस्थित होता. "आपकी बार, किसान सरकार","मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जिंदाबाद" च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गुलाबी झेंडे आणि गुलाबी कमानी यामुळे ही सभा लक्षवेधी ठरली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group