राम दातीर माहूर ( प्रतिनिधी )रामनवमी उस्तवानिमित्त बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे मोठी यात्रा भरते.त्या यात्रेत होणाऱ्या...
राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी )रामनवमी उस्तवानिमित्त बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे मोठी यात्रा भरते.त्या यात्रेत होणाऱ्या अन्नदानात हातभार लावण्यासाठी गोर बंजारा समाजाचे वतीने माहूर येथून दि.25 मार्च रोजी एका वाहनाद्वारे 25 क्विंटल धान्य रवाना करण्यात आले.
पोहरादेवी येथे रामनवमीला देश व विदेशातून लाखों भाविक येतात. तिथे होणाऱ्या महाप्रसादासाठी गोर बंजारा समाजाचे वतीने 25 क्विंटल धान्य रवाना करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,बालाजी पवार, किसन राठोड,कुंदन राठोड, संदीप राठोड, डी. डी. चव्हाण, राहुल राठोड, शांतीलाल राठोड,संजय राठोड,बालाजी जाधव, युवराज आडे व श्याम माऊली यांची उपस्थिती होती.
.jpg)
COMMENTS