माहूर (प्रतिनिधी ) माहूर शहरातील बौद्धभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साफसफाई करतांना एका झूडपात सुनील कांबळे यांना 500 रुपयाच्या ८७ हजाराच्या व दि.25 मार्च रोजी स.10-30 वाजताचे सुमारास विक्रम राठोड यांना उखळी घाटात 500 रुपयाच्या 19 बनावट नोटा सापडल्याने सर्वत्र हडकंप मचला आहे.
माहूर शहरातील वार्ड क्र.३ मधील बौद्धभूमी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साफ सफाईचे काम करतांना सुनील दत्ता कांबळे याला झुडपात ५०० रुपयाच्या 174 नोटांचे बंडल दिसून आले.सदरची बाब त्याने आकाश कांबळे यांना सांगितली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी दि.24 मार्च रोजी रात्रीला नोटाचे बंडल जप्त करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 489 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.दि.25 मार्च रोजी स.10-30 च्या सुमारास विक्रम राठोड हे पत्नीसह पाचवीच्या कार्यक्रमाला जात असतांना उखळी घाटात रोडच्या बाजूला त्यांच्या पत्नी नगरसेविका सागर राठोड यांना 500 रुपयाचे बंडल दिसून आले. त्यांनी दुचाकी थांबवून ते बंडल उचलले, आणि पत्रकारांच्या समवेत पोलीस ठाणे गाठून त्या नोटा पोलिसांच्या स्वाधीन केल्या.उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे,पो. नि. डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनात स. पो. नि. संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत.
.jpg)
COMMENTS