तामसा (वार्ताहर ):- हदगाव तालुक्यातील तामसा येथिल भाजी भाकरीच्या पंगतीला १२५वर्षाची परंपरा कायम आसून यात्रा दोन वर्ष कोरोणा काळात बंद करण्...
तामसा (वार्ताहर ):- हदगाव तालुक्यातील तामसा येथिल भाजी भाकरीच्या पंगतीला १२५वर्षाची परंपरा कायम आसून यात्रा दोन वर्ष कोरोणा काळात बंद करण्यात आली होती.ती आता१६ जानेवारी रोजी सोमवार ला यात्रा होणार असल्याची माहिती तामश्याचे सरपंच बालाजी महाजन यांनी दिली.
तामसा शहर जवळून गेलेल्या तमसा नदी या किनारी वसलेले असुन या शहराची एक वेगळीच अख्यायिका आहे.प्रभू रामचंद्राच्या पवित्र पदस्पर्शाने आसलेल्या भाजी-भाकरीच्या पंक्तीस एक अनोखी भेट म्हणून त्या भाजी भाकरीच्या पंगतीला एक वेगळेच महत्त्व आहे.यामध्ये कोणत्याही झाडाचा रान मिश्रीत पाला एकत्र करुन भाजीचा समावेश केला जातो.
त्यामुळे कोणताही अंगरोग असो तो नष्ट होतो.अशी माहिती वयोवॖध्द जूने जाणते लोक माहिती देतात. त्या मंदीरा समोरच प्रभू रामचंद्रांनी बाण मारून सितामातेला तहान लागली होती ती जमिनीवर बाण मारून पाणी पाजले .ती विहीर ची कितीही उन्हाळा असला तरी पाणी आटत नाही.अशी अख्यायिका आहे.परंतू आता भाजी भाकरी मध्ये रान मिश्रीत भाजी न वापरता विकत भाजीपाल्याची प्रथा सुरू झाली आहे.
हे मंदीर भोकर रोडवर पश्चिम दिशेला आहे.या भाजी भाकरी घ्या पंगतीला राज्यातून नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातून भाविक भक्त येतात.जसे की आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून ही भाविक भक्त भाजीभाकरीचा आस्वाद घेण्यासाठी येतात.या यात्रेत सर्व समाज बांधव उत्साहाने भाग घेतात.या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी चालू आहे.आसे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष संतोष निल्लावार यांनी ही माहिती दिली.
..........
COMMENTS