अनेक मित्रांनी कविता एकत्र कराव्यात अशी सूचना केली होती.त्यानुसार 'अस्वस्थ क्षणांच्या नोंदी' हा कवितासंग्रह मागील आठवड्यात प्रसिद्ध झाला. गेल्या काही वर्षातील माझ्या विविध सामाजिक राजकीय कविता एकत्र केल्या आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची या संग्रहाला प्रस्तावना आहे तर ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी मलपृष्ठ लिहिले आहे.
' भारत जोडो' यात्रेवरील 'तो निघालाय' व 'बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशोब लागत नाही' या गाजलेल्या दोन कविता सुरुवातीला असून common man ही माझी गाजलेली कविता शेवटी घेतली आहे. मेधा पाटकर, इरोम शर्मिला, नरहर कुरुंदकर,गणपतराव देशमुख, यांच्यावरील व टीव्हीवर, सोशल मीडियावर आलेल्या व अनेकांना आवडलेल्या कविता यात समाविष्ट केल्या आहेत.
माझा मुलगा चार्वाक याने अनेक कवितांना चित्र काढली आहेत.
हे पुस्तक आपल्याला पोस्टाने हवे असल्यास आपण 9921288521 या whatsapp वर मेसेज करावा.
अस्वस्थ क्षणांच्या नोंदी
पुस्तक मार्केट प्रकाशन,
पृष्ठे ७२
*हेरंबकुलकर्णी*

COMMENTS