तात्या गेले…..
तात्या मराठवाडय़ातील जनावराचे प्रख्यात डॉ तात्या तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचे सार्थक केलात कुठलेही पदवी नसताना तुम्ही पदवी घेतलेल्या डॉ ना जे जमले नाही ते तुम्ही मुक्या जनावराचे आजार दूर करून आशीर्वाद घेतलात माणसातील मानसाप्रती असलेली संवेदनशीलता बाेथट हाेताना पदाेपदी दिसत आहे. माात्र तुम्ही लाखाे मुक्या जनावरांचे आशीर्वाद घेतलात तात्या तुमच्या वैद्यकीय उपकरणाची तर बातच न्यारी रानातील गौर्या त्यात सळई गरम करुन जनावराच्या नसेचा अचुक वेध तुम्ही घेत असत वासरु टाकून दिलेल्या जनावरांना देखील पुन्हा त्या वासराबद्दल त्या जनावराला पुन्हा जन्म दिल्या ची भावना लळा लावण्याचे काम महाकठीण काम पण पुन्हा कृत्रिम जन्म कळा तयार करुन कित्येक जनावरे टाकलेले वासरु स्विकारत, ताठरलेला पान्हा वासराला पाजवत असत. जनावरांचे अनेक आजार त्यातील एक किळसवाणा आजार भांडे पडल्याचा आतील आतडे बाहेर पडल्याचे पाहुनच शेतकऱ्यांना घाबरे सुटायचे पण तुम्ही मात्र चुटकीसरशी ते बसवत असत निष्णात डॉ ना ही जमले नाही ते तुम्ही करत गेलात पाय घसरून पडलेले जनावर असो की पाय माेडलेले, हुंडी निसटलेले तुम्ही लगेच ओळखायचे ये सिताराम, भिमराव काेनीही असो अगा … ये सकाळी मी येताे गौर्या पेटवून ठेव चुटका द्यावे लागतय गा… तात्या सकाळीच खांद्यावर उपरणे टाकुन हजर…! का करलालीस गा चांगल गरम कर सळई म्हणत चटका द्यायचे दुसर्या दिवशी जनावर पुर्ववत व्हायचे त्याकाळी माेबईल लँन्डलाईन फोन ची कसलीही सुविधा तुमच्या कडे नव्हती काेनीही आले की तात्या तयार घरातील सर्व कामे जिथल्या तिथे टाकुन निघायचे तुमच्या या कामात कधीच ताई पत्नी कधीच खाेडा घातला नाही ताई ला. विचारले की ताई म्हणायची तुझा तात्या चार गावचा पाहुना रे…… ताई असे म्हणत त्या माऊली चे. एक वैशिष्टय़ होते की किती पैसे आणले कशाला जाता म्हणून कधीच उभ्या आयुष्यात तक्रार केली नाही तुमच्या डॉक्टरकीच्या व्यवसायात ताई खंबीरपणे उभ्या राहिल्या तुमच्या संसार वेलीवर ४ अपत्य त्या सर्वाचे तुमच्या आशीर्वादाने सर्वाचे कल्याण झाले लक्ष्मण, संजीव, शत्रुघ्न बारकी पण तुमची केमिस्ट्री जास्त जुळायची ते लक्ष्मण भाऊ साेबत लक्ष्मण येताे म्हनलाय गा….. म्हणून बालाजी माेडला बघत लातूर गाडीची वाट बघत असत ये महाराज दिवस फिरलाय गा लातूर गाडी गेली का? लक्ष्मण येताे म्हनलाय गा म्हनायचाे तात्या खरच चौघांनी पण तुमची सेवा केली नुकत्याच झालेल्या दिवाळी त लक्ष्मण भाऊ तुम्हाला अंघोळ घालत असलेले मी पाहीले माझ्या ही डाेळ्यात टचकन पाणी आले तुमची मनाेभावे सेवा सर्वानी केली तात्या तुम्ही आज आमच्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही तुम्ही इहलाेकाच्या प्रवासाला निघालात आज निश्चितच प्रत्येक गाेट्यातील गाय हंबरली असेल तुमच्या असंंख्य आठवणी मनात घर करुन आहेत. तुमचा इहलाेकीचाा प्रवास सुखकर होवो मला तुमच्या अंत्यसंस्कार ला उपस्थित राहता येणार नाही तात्या मी नुकतीच बालभारती शिक्षण मंडळ पुणे येथील मिटींग करुन पुण्याहून निघालो आहे बातमी वाचल्याबरोबर मी पाहिलेले तुकाराम तात्या आठवले म्हणून हा पंक्ती प्रपंच......
माझ्या मनात एक हुरहुर राहुन गेली तात्यचे अंतिम दर्शन झाले नाही तात्या साश्रू नयनांनी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली शिंदे खटकाळे परिवाराला दु:ख पेलण्याची ताकत परमेश्वर देवो हिच प्रार्थना.........
आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा………..
शोकाकुल
धनराज बाबुराव भारती

COMMENTS