प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात देवी देवतांच्या नावावर मोठ मोठ्या यात्रा भरतात सदर यात्रेमध्ये हौशे,नवसे गौशे लोकांची गर्दी होते. यात्रेत अबंट शौकीन दाखल झाल्याने अवैध धंदे खुले आम सुरू असतात जिल्ह्यातील यात्रा उत्सवात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार जी श्रिधर यांनी घेतल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदार यांना दिल्या होत्या. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये देवी देवतांच्या नावावर यात्रा उत्सव सुरू असुन सदर यात्रेत अवैध धंदे जोरात सुरू झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे यात्रा उत्सव सुरू असुन यात्रे मध्ये अवैध दारू, जुगार अड्डे, मटका आदी अवैध धंद्ये जोरात सुरू झाले आहेत. सदर अवैध धंदे बंद करण्यासाठी पिंपळदरी येथील ग्रामस्थ महिला पुरूषांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी पिंपळदरी येथील तातेराव शेळके, दि पंडित, शेख बाबू, ज्ञानेश्वर इंगळे, माधव बरकोट, गोविंद बेले ,बळीराम धनवे, भगत बबन, किसन काळे, देवानंद रिठे, अखिल शेख, नामदेव रिठे, परसराम इंगळे, सुनीता भगवान रिठे, नीला शकुराव काळे, निर्मला कोंडबा रिठे, सुनीता श्रीरंग रिठे, लक्ष्मी शामराव रिठे, रुक्मिना रामू बेले, कलाबाई प्रकाश रिठे, अरुणाबाई महादू काळे, देवकाबाई आनंदराव काळे, पंचफुला शेषराव भुरके, मथुराबाई बाबुराव रिठे, शशिकला नारायण बर्गे, सीताबाई दादाराव रिठे, रुक्मिना आप्पाराव रिठे, जानकाबाई सदाशिव हजारे, वनिता ज्ञानेश्वर माघाडे, सुनिता सखाराम गव्हाणे यांच्या सह मोठ्या प्रमाणात पिंपळदरी ग्रामस्थांची उपस्थीती होती.

COMMENTS