सेलू - स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सुरू असलेल्या नितीन चषक क्रिकेट स्पर्धा दरम्यान दि. 22 जानेवारी रोजी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री मा. संदीपान भुमरे यांनी भेट देऊन खेलो इंडिया व राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंचा सत्कार केला. याप्रसंगी ना. सदिपान भुमरे यांना भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळास ५% आरक्षणासाठी परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल अध्यक्ष मा.आ. हरीभाऊ काका लहाने व राज्य चिटणीस गणेश माळवे , संदिप लहाने, गिरीष लोडाया,प्रा.नागेश कान्हेकर यांनी निवेदन दिले.
याप्रसंगी ना. संदिपान भुमरे म्हणाले की नितीन चषक क्रिकेट स्पर्धा हि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ घेऊन, क्रीडा पटूना ही सर्व सुविधा देणारी नामवंत स्पर्धा आहे. भारतीय टेनिसव्हॉलीबॉल खेळास ५%आरक्षणासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना साकडे घालू, महाराष्ट्रच्या मातीतला व ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर टेनिसव्हॉलीबॉल खेळाडू पदक प्राप्त करून देश पातळीवर नावलौकिक करतात ही अभिमानास्पद बाब आहे.
राष्ट्रीय खेळाडूंचा नितीन क्रीडा मंडळाच्या वतीने रोजगार हमी फलोत्पादन मंत्री ना.सदिपान भुमरे, यांच्या हस्ते किटबॅग देऊन सन्मानित करण्यात आले .
खेलो इंडिया गटका क्रीडा स्पर्धा हरियाणा पंचकुल.खरात सपना ,डिग्रसकर,विनायक, तेजस्विनी महाजन ,ऋषिकेश पेठारे ,
युथ: निलेश माळवे :सोमनाथ पोपळे (:ओरिसा रौप्यपदक )
राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल सिनिअर क्रीडा स्पर्धा: लिपने सिध्दार्थ , नावाडे कमलेश,नावाडे चैतन्य , गोसावी साक्षी ,गजानन शिंदे ( दिल्ली कांस्यपदक )
सबज्युनियर :माळकर सार्थक ,गायके आर्यन, (तामिळनाडू कांस्यपदक )
मिनी गटात: चव्हाण कृष्णा (ओरीसा कांस्यपदक )

COMMENTS