मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील गोदाम अधिक्षक जोगेंद्र मुजावर हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेनंतर मुंबई पोर्टमधून ३१ डिसेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.
हमालेज बिल्डिंगमधील टाईम किपर कार्यालयामध्ये ३१ डिसेंबर २०२२ रोजी गोदी विभागातील जोगेंद्र मुजावर, सुधीर साटम, विश्वनाथ मोरजकर, अनिल वाघमारे, शरद हिरे, सुनील पाटील, सतीश खानविलकर, विलास चव्हाण या आठ गोदाम अधिक्षक कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपगोदी प्रबंधक शैलेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी विश्वस्त सुधाकर अपराज व व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जोगेंद्र मुजावर व इतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, चीफ टाईम कीपर बबन हाडवळे, मुंबई पोर्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे सेवानिवृत्त कार्याध्यक्ष संजय माधव, असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर केवट, कार्यकर्ते शिवाजी सावंत, शिवाजी देसाई, संजय लांघी, नामदेव घोडके आदी मान्यवरांनी शुभेच्छा देताना जोगेंद्र मुजावर हे लोकप्रिय, निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असून कामगारांच्या सुखदुःखात व समाजाला उपयोगी पडणारे निस्वार्थी कार्यकर्ते आहेत. जोगेंद्र मुजावर यांनी मुंबई उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले असून, अनेकांना सहकार्य केले. ड्रीम फाउंडेशन, सहकार ८३ अशा अनेक ग्रुपमध्ये त्यांचा चांगला सहभाग आहे. याशिवाय आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव त्यांना चांगलीच आहे. म्हणूनच त्यांनी कल्याण येथील लोक ग्राम वसाहतीमध्ये व आपल्या जन्मगावी तीन मंडळाची स्थापना करून जनतेची सेवा केली. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टमध्ये कर्मचाऱ्यांना संकट काळात वेळोवेळी सहकार्य केले. यापुढे त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो व त्यांना उर्वरित आयुष्य निरोगी जावो. अशाप्रकारे सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे गोदाम अधिक्षक व ह. भ.प. श्री. ए. डी. राऊत यांनी केले. सत्कार सोहळ्याला कामगार, कर्मचारी, कुटुंबिय व सहकार ८३ चे शेखर बर्वे, प्रकाश परब यांच्यासहित अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धी प्रमुख मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन


COMMENTS