राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद,बीड सुवर्णपदक तर परभणी संघास कांस्यपदक*

नाविन्यपूर्ण खेळ टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंना ५%आरक्षण साठी प्रयत्न करणार:आ.वरपुडकर सेलू (. )  टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन...


नाविन्यपूर्ण खेळ टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंना ५%आरक्षण साठी प्रयत्न करणार:आ.वरपुडकर

सेलू (. ) 

टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने फ्रेन्डस क्लब सेलू व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २४ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचा दि. ३१ डिसेंबर रोजी फ्रेन्डस क्लब क्रीडांगणावर समारोप सोहळा माजी राज्यमंत्री आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

       राज्य वरिष्ठ पुरुष गटात औरंगाबाद तर महिला गटात बीड, मिश्र दुहेरीत परभणी जिल्हा संघांनी बाजी मारली.

      या स्पर्धेत राज्य संघटनेचे मान्यतेने राज्य तील २५ जिल्हा पुरुष व महिला संघ सहभागी झाले होते. 

अंतिम सामना औरंगाबाद वि. सांगली चुरशीच्या लढतीत २:१ सेट मध्ये औरंगाबाद संघाने बाजी मारली तर सांगली उपविजेता तर परभणी तृतीय क्रमांक पटकावला.

महिला गटात बीड जिल्हा विजयी तर परभणी मनपा उपविजेता तर बुलढाणा तृतीय क्रमांक पटकावला. 

मिश्र दुहेरीत: परभणी, परभणी मनपा, बुलढाणा अनुक्रमे विजयी ठरले.

स्पर्धेत एकुण १८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

बक्षीस वितरण समारंभात माजी राज्यमंत्री आ.सुरेशराव वरपुडकर म्हणाले की महाराष्ट्र जन्मलेला नाविण्यपूर्ण टेनिस व्हॉलीबॉल खेळात भरपूर व्यायाम देणारा खेळ आहे. विविध खेळांच्या कौशल्याचा वापर करून डॉ.व्यंकटेश वागवांड यांनी या खेळाचे संशोधन करून देशाला नविन खेळ दिला. कबड्डी,खो-खो, खेळा सोबत टेनिस व्हॉलीबॉल खेळास आरक्षणासाठी मंञालयात प्रश्न मांडू असे आश्वासन दिले.

     उपांत्यपूर्व फेरीत पुरुष गटात परभणी, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, पुणे शहर, बीड, लातूर, सांगली जिल्हा संघाने प्रवेश केला. उपांत्य फेरीत औरंगाबाद वि परभणी दरम्यान चुरशीच्या लढतीत २:१ सेट मध्ये औरंगाबाद अंतिम फेरीत दाखल झाले. 

दुसरा उपांत्य फेरीत सांगली वि.लातूर दरम्यान चुरशीच्या लढतीत २:१ सेट मध्ये सांगली जिल्हा अंतिम फेरीत दाखल झाला. 

     बक्षीस वितरण समारंभात माजी राज्यमंत्री आ.सुरेशराव वरपुडकर, आंतरराष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल महासचिव डॉ व्यंकटेश वांगवाड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, साईबाबा बॅक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद बोराडे, माजी जि.प. सभापती अशोक काकडे, उद्योजक नंदकिशोर बाहेती, तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डीकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, फ्रेन्डस क्लब अध्यक्ष चंद्रकांत बोराडे, ज्ञानोबा बोराडे, तुकाराम बोराडे,राज्य चिटणीस गणेश माळवे, दिनेश शिगारम, रामेश्वर कोरडे,संजय ठाकरे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत बोराडे, सुञसंचलन मोहन बोराडे आभार प्रदर्शन गिरीष लोडाया यांनी मानले.

     पंचप्रमुख: प्रफुल्लकुमार बन्सोड, किरण घोलप,संतोष शिंदे, गणेश पाटील, राहुल पेटकर, सुनील हिवाळे , सिद्धांत लिपने, निनाद रहाटे, 

    स्पर्धा परभणी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ लहाने, कार्याध्यक्ष विनोद बोराडे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत बोराडे, आयोजन समितीचे सचिव ओमप्रकाश तोष्णीवाल, राज्य महासचिव गणेश माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोराडे, राजेश गुप्ता, रविंद्र कुलकर्णी, प्रा.नागेश कान्हेकर जिल्हा सचिव सतिश नावाडे, अश्विन केदासे, गजानन साळवे, जुगलकिशोर बाहेती, भाऊसाहेब केवारे, नंदलाल परताणी, भास्कर बोराडे, राजेंद्र बोराडे, शाम झंवर, उध्दव पवार, रविंद्र केवारे,जिकर भाई, शिवाजी फोफसे, शर्मा, आदी परीश्रम घेत आहेत

[पुरुष गटात औरंगाबाद संघास सुवर्णपदक चषक देताना आ.सुरेशराव वरपुडकर, डॉ.व्यंकटेश वांगवाड, चंद्रकांत बोराडे, हेमंतराव आडळकर, मुकेश बोराडे अशोक काकडे, नंदकिशोर बाहेती, गणेश बोराडे, महेश खर्डेकर, संजय मुंढे, गणेश माळवे, सतिश नावाने,

[कांस्यपदक विजेता परभणी जिल्हा संघ

[महिला संघ विजेता बीड जिल्हा संघ


पुरुष गटात औरंगाबाद संघास सुवर्णपदक चषक देताना आ.सुरेशराव वरपुडकर, डॉ.व्यंकटेश वांगवाड, चंद्रकांत बोराडे, हेमंतराव आडळकर, मुकेश बोराडे अशोक काकडे, नंदकिशोर बाहेती, गणेश बोराडे, महेश खर्डेकर, संजय मुंढे, गणेश माळवे, सतिश नावाने,

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel