भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालयांच्या अधिपत्याखालील दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड मुंबई विभाग व गोवर्धन कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मु.गोऱ्हे, ता. वाडा, जिल्हा पालघर येथे 23 डिसेंबर 2022 रोजी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोर्डाचे चेअरमन विरजेशजी उपाध्याय यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रमिकांना संघटित करणे, त्यांना विविध प्रकारच्या शासनाच्या योजना, केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना, बचत गट, स्वयंरोजगार व्यवसाय व उद्योग धंदा आर्थिक सहाय्यता इत्यादी विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येते
याप्रसंगी सरपंच हर्षदा पडवळे, गोवर्धन कौशल्य विकास केंद्राचे प्राचार्य आनंद गोसावी, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कृष्णा दास, कौशल्य विकास तज्ञ विनायक जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
झोनल व प्रादेशिक संचालक(प्र) चंद्रसेन जगताप यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, सरकारच्या माध्यमातून असंघटित श्रमिकांना विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांना शासनातर्फे मानधन व प्रमाणपत्र देण्यात येते.
सदर कार्यक्रमास उपसंचालक योगेश चाटी, कामगार संघटक विठ्ठल नारगुडे, सुनील प्रभू इत्यादी तज्ञांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोर्डाचे चेअरमन उपाध्याय यांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र घारपुरे भूषण पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS