औरंगाबाद ( )पॅरादीप उडीसा येथे 23 ते 25 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न होणार आहे यासाठी गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयाच्या मैदानावर 19 ते 21 डिसेंबर दरम्यान युथ व मिनी गटाच्या मुला मुलींचे महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल संघांचे सराव शिबीर औरंगाबाद जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेळाडूचा समावेश आहे सराव शिबीर पूर्ण करून हा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुणे येथून रवाना झाला आहे या संघाला किट व ट्रॅकसूट गंगापूर नगरपालिकेचे नगरसेवक भाग्येश गंगवाल व डॉ आबासाहेब सिरसाठ यांच्या वतीने देण्यात आल्या आहे. या संघाला शुभेच्छा देण्यासाठी मुक्तानंद महाविद्यालयाच्या प्रचार्या पाटील मॅडम राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघटनचे उपाध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ राज्य महासचिव गणेश माळवे, फ्रेंड्स क्लब सेलू अध्यक्ष चंद्रकांत बोराडे, इनग्राऊंड चे विश्वजीत चव्हाण,उप प्राचार्य विशाल साबणे,नागेश कान्हेकर,अली बाकोदा, मेहमूद पठाण, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रमोद महाजन, करण खोमणे,आशिष ओबेरॉय, गायत्री पेंडारकर, स्नेहा जाधव,रवींद्र भोसले जबाबदारी पार पाडणार आहेत
*युथ मुले* : कर्णधार निलेश माळवे, सोमनाथ पोपळे, साहिल जगदंडे, कार्तिक भुसारे, सुमित जाधव, पराग सोनावणे, अविनाश जाधव
*युथ मुली* कर्णधार: तनिष्का धारणे, पियुषा पाटील, प्राची कडणे,रोशनी राहासे, रोशनी बारेला,उर्मिला बारेला, सरगम पवारा,
*मिनी मुले* कृष्णा चव्हाण, सहर्ष कोकाटे, ओम वायाळ, पवन खाडे, रणवीर भोसले, शोर्या शिंदे,आर्यन गायके,
*मिनी मुली* सई फडकरी, निशा भट्ट,शरयू काटे, प्रांजल सूर्यवंशी,श्रुती शर्मा,श्रेया डव्हाण,आव्हानी जाधव
आदी खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे


COMMENTS