प्रतिनिधी -महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात मागिल अनेक वर्षांपासून शहरातील देशी दारू दुकानावरून खेडो-पाडी मोटारसायकल व फोर व्हीलर द्वारा अवैध दारू ची वाहतुक करून खेडो-पाडी विक्री साठी पोहचवली जाते. यावर अनेकवेळा पोलिसांनी कारवाया करून सुद्धा पार्सलचा गोरखधंदा थांबता थांबेना. हिंगोली जिल्ह्यात दोन महिन्यापुर्वी रूजू झालेले आयपीएस अधिकारी जी श्रीधर यांना अवैध दारू वाहतुक थांबण्यास यश येईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात देशी वाईन शॉप मालकांनी अवैध दारू पार्सल चा गोरख धंदा जोरात सुरू केला असुन दारू पार्सल करण्यासाठी परवानाधारक देशी दारू दुकाने ठरवून दिलेल्या वेळेपुर्वीच दुकाने उघडून अवैध दारू खेड्यापाड्यात पार्सल करीत आहेत. अनेक पोलिस अधीकारी जिल्ह्यात आलेत मात्र सदर गोरख धंदा बंद करण्यात अपयशी ठरले. जिल्ह्यात दाखल झालेले यंग आयपीएस पोलिस अधिकारी जी श्रीधर यांच्या कडून जिल्हावाशीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात आनण्यासाठी कारवाई चा धडाका सुरू केल्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश निर्माण केला आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व वाहतूकीवर मोहीम राबवून मोठी कारवाई होणे गरजेचे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग हिंगोलीत नावालाच असुन त्यांच्या कारवाया कमी आहेत. सदर विभागातील अधिकारी यांना विचारणा केली असता कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण सांगतात. पोलिस विभागाने अनेक ठाण्याचे हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर मोठ्या कारवाया केल्या आहेत. चार दिवसांपूर्वी खांबाळा रेल्वे पुलाखाली मोटारसायकल द्वारा दारूची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. यामध्ये वाईन शॉप धारकावरही हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गोरखधंदा थांबता थांबेना. यावर आता जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS