सानपाडा येथे रेल्वे प्रवास भजन मंडळाची भजन स्पर्धा संपन्न*

नवी मुंबईत नवविधी भक्ती सेवा समितीच्या वतीने १८ डिसेंबर २०२२ रोजी सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्रात रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन स्पर...


नवी मुंबईत नवविधी भक्ती सेवा समितीच्या वतीने १८ डिसेंबर २०२२ रोजी सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्रात रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे व गायत्री चेतना केंद्राचे विश्वस्त मन्नूभाई पटेल यांनी हार्बर, सेंट्रल व वेस्टर्न रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवासी भजनी मंडळांना त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व सहभागाबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवी मुंबईचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, नवी मुंबईचे उपशहर प्रमुख सोमनाथ वासकर, सानपाडा येथील नगरसेविका कोमल वासकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, अजय पवार यांचे वडील महादेव पवार, पश्चिम रेल्वेच्या संत सेवा भजन मंडळाचे अध्यक्ष वसंत प्रभू, संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळाचे सचिव जयराम पवार, मध्य रेल्वेच्या विठू माऊली भजन मंडळाचे अध्यक्ष राजेश पालकर, नवविधी भक्ती सेवा समितीचे अध्यक्ष आत्माराम सुर्वे, सचिव विनय धडवे, खजिनदार सुनील मस्कर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिवसेनेचे शाखाप्रमुख अजय पवार यांनी सर्वांचे आभार मानले. या स्पर्धेमध्ये हार्बर सेंट्रल व वेस्टर्न रेल्वेच्या २० प्रवासी भजनी मंडळांनी भजन स्पर्धामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमास सानपाडा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे विशेष सहाय्य मिळाले.

आपला

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel