मुंबई: बॉम्बे डाइंग टेक्सटाइल,स्प्रिंग आणि श्रीनिवास मिलच्या तसेच एम.एम.आर.डी.ए.च्या २४१७ घरांबाबत १जानेवारी १९८२ चा दाखला व वर्षाला २४० दिवस न भरल्याचा पुरावा नसल्याचे कारण देऊन, विजेत्या कामगारांना कामगार आयुक्तालयाच्या अधिका-यांनी अपात्र ठरविले होते.त्यामुळे कामगारांमध्ये फार मोठा असंतोष उफाळून आला होता.सदर कामागारांनी मुंबई गृहनिर्माण मंडळ व कामगार आयुक्त कार्यालयाच्या कामकाजा बाबत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्याकडे तक्रार करतांना नाराजी व्यक्त केली होती.त्या नंतर या प्रश्नाला गती मिळाली .
कामगार आयुक्त कार्यालयाने यावर म्हाडा सोबत संयुक्त बैठक आयोजित केली.बैठकीला अतिरिक्त कामगार आयुक्त शिरिन लोखंडे, उपकामगार आयुक्त,निलांबरी भोसले व त्यांचे सहकारी तसेच मुंबई गृहनिर्माण मंडळाचे उपअधिकारी टि.पी.राठोड,तर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण उपस्थित होते.अन्य कामगार संघटनांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत वरील दोन बाबीवर तपशीलवार चर्चा झाल्या नंतर जेवढ्या कामगारांना अपात्र ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांची संपूर्ण माहिती मुंबई गृहनिर्माण मंडळाने कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठवावी. कामगार आयुक्तांनी त्यांची फेरतपासणी करून वरील दोन बाबींवर कामगारांना अपात्र केले असतील तर त्याना पात्र करावे,असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे सदर कामगारांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.****

COMMENTS