हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेना सानपाडा विभागातर्फे विभागातील नागरिकांसाठी नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच आधार कार्ड दुरुस्ती शिबिराचे आयोजन केले असून उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव व शिवाई महिला मंडळच्या अध्यक्षा सौ. शुभांगी सुर्यराव यांनी सानपाडा रेल्वे स्टेशन जवळ, शिवसेना शाखा क्रमांक ७६ येथे आयोजित केले असून, सदर शिबिर दिनांक २२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत असून सकाळी १० ते ५ पर्यंत सुरू राहील. यावेळी विभाग प्रमुख सुनील गव्हाणे, शाखाप्रमुख अजय पवार, अतुल डेरे, बाबाजी इंदोरे, कार्यालय प्रमुख शामराव मोरे, सुधाकर दौंड ,मारुती शिंदे काका, तानाजी चव्हाण,सुभाष इंदोरे,दत्ता कुरळे , उपशाखाप्रमुख उल्हास शिंदे, सचिन शिंदे, आणि विभागातील शिवसैनिक महिला आघाडीच्या पदाधिकारी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
आधार शिबिरात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असून, त्यांच्याकडून सुर्यराव दांपत्याचे कौतुक होत आहे. सतत जनतेच्या आवश्यक गरजांची कामे विविध उपक्रमां तून होत असून, खऱ्या अर्थाने समाजकारण हे शिवसेना शाखेतून होत असतात, याबाबत लोक समाधान व्यक्त करत आहे.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS