छत्रपती संभाजीनगर/लातूर: देशभरात गाजणाऱ्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात आज एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. लातूरमधी...
छत्रपती संभाजीनगर/लातूर: देशभरात गाजणाऱ्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात आज एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) कोचिंग क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) दोन दिवसांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एका पालकाच्या तक्रारीने सुटला धागा!
'नीट' परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर, एका सजग पालकाने लातूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. "मोटेगावकरांच्या शिकवणी वर्गातून तब्बल ४२ प्रश्न जसेच्या तसे नीट परीक्षेत आले होते," असा खळबळजनक आरोप या पालकाने केला होता. लातूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असतानाच, सीबीआयने या केसची सूत्रे आपल्या हातात घेतली.
'केमिस्ट्री' कनेक्शन आणि उत्तर प्रदेश-बिहारचे शिक्षक
या प्रकरणात अटक करण्यात आलेले सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यात एक समान धागा आढळला आहे.
कुलकर्णी हे रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचे प्राध्यापक होते. शिवराज मोटेगावकर हे देखील स्वतः केमिस्ट्री हाच विषय शिकवतात.
या 'केमिस्ट्री कनेक्शन'चा आणि पेपरफुटीचा काय सहसंबंध आहे, याचा शोध आता सीबीआय घेत आहे. विशेष म्हणजे, मोटेगावकरांच्या क्लासमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शिक्षक अध्यापनाचे काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
'लातूर पॅटर्न' की फॅक्टरी ?
लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठमोठे बॅनर्स लावून कौतुक करण्यापासून ते लातूरच्या शिक्षणाच्या प्रारूपाचे (Pattern) 'फॅक्टरी'मध्ये रूपांतर केल्याची जाहिरातबाजी मोटेगावकर करत असत. लातूरमध्ये जवळपास ३० ते ३२ नामांकित क्लासेस असून, अशी 'फॅक्टरी' म्हणून जाहिरात इतर कोणत्याही क्लासकडून केली जात नव्हती, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
पुढे काय? नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या इतर मुख्य आरोपींशी आणि मोटेगावकरांचा नेमका काय संबंध आहे, हे अद्याप सीबीआयकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, या कारवाईमुळे नांदेड आणि लातूर या दोन्ही शैक्षणिक हबमध्ये येत्या काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.
शिवराज मोटेगावकरांबाबत सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर; परीक्षेच्या १० दिवस आधीच मोबाईलमध्ये होता पेपर!
लातूर/पुणे: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातून अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. सीबीआयने ताब्यात घेतलेले लातूरच्या 'आरसीसी' कोचिंग क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये थेट नीट परीक्षेची प्रश्नपत्रिकाच आढळून आली आहे.
तपासातील सर्वात मोठे खुलासे:
१० दिवस आधीच पेपर लीक? नीटची परीक्षा ३ मे रोजी होणार होती. मात्र, शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये २३ एप्रिल रोजीच (परीक्षेच्या १० दिवस आधी) प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार होती, असे सीबीआय तपासात उघड झाले आहे.
NEET UG 2026' नावाने फोल्डर: मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये 'NEET UG 2026' या नावाने एक विशेष फोल्डर तयार करण्यात आले होते. या फोल्डरमध्येच सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरांचे संच लपवून ठेवण्यात आले होते.
संघटित टोळीचे सक्रिय सदस्य: शिवराज मोटेगावकर हे पेपरफुटी करणाऱ्या या आंतरराज्य संघटित टोळीचे (Gang) केवळ संपर्कात नव्हते, तर ते या सक्रिय टोळीचा एक महत्त्वाचा भाग आणि मुख्य दुवा असल्याचा स्पष्ट निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.
मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे रवाना
सीबीआयने मोटेगावकर यांच्याकडून जप्त केलेला हा मुख्य मोबाईल आणि लॅपटॉप पुढील तांत्रिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. २३ एप्रिल रोजीच हा पेपर मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये कुठून आणि कोणामार्फत आला? आणि त्यांनी हा पेपर इतर किती आरोपींना किंवा विद्यार्थ्यांना पाठवला? याचा कसून शोध आता सीबीआय घेत आहे. या खळबळजनक खुलाशामुळे लातूर आणि नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी घबराट पसरली आहे.
आम्ही सदर न्युज सातत्याने अपडेट करत आहोत
दोन दिवसांपासून सुरू होती गुप्त चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सीबीआयचे एक विशेष पथक लातूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी आरसीसी कोचिंग क्लासच्या कार्यालयावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, कॉम्प्युटर्स आणि मोबाईल फोन जप्त केले होते. त्यानंतर रविवारी दुपारी २ वाजल्यापासून मोटेगावकर यांची कसून चौकशी सुरू होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या चौकशीनंतर अखेर आज सीबीआयने त्यांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.एका पालकाच्या तक्रारीने सुटला धागा!

COMMENTS