मुंबई पोर्टमध्ये २५ नोव्हेंबर २०२२ हा "स्त्रि अत्याचार विरोधी दिवस" याचे औचित्य साधून मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेडिकल विभागातील सॅनिटरी सेक्शन मधील कायाकल्प बिल्डिंगमध्ये महिला कामगारांसाठी कार्यक्रम संपन्न झाला. मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल मधील सीनिअर डेप्युटी मेडिकल ऑफिसर डॉ. आरती उगांवकर या प्रमुख मार्गदर्शक होत्या. त्यांनी सर्व महिलांना स्त्रीवर होणारा अत्याचार कसा परतावून लावायचा यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनच्या उपाध्यक्षा श्रीमती शीला भगत यांनी केले. मेट्रन श्रीमती मेघा सोबळकर, सॅनिटरी इन्स्पेक्टर राजेन्द्र भाबल,विजय भिसे,अशोक डफळ,बाबुराव जाधव यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.या कार्यक्रमाला सिस्टर इन्चार्ज अरुणा बोधानी, नर्सिंग सिस्टर योगीनी दुराफे, सॅनिटरी विभागातील सर्व महीला व पुरुष कामगार, पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल मधील नर्सिंग सिस्टर, सुमित कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सॅनिटरी सुपरवायजर संजय धुमाळ आणि श्रीमती सीमा मॅडम यांनी सहकार्य केले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिध्दीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS