मुंबई दि.२६ : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संविधानदिन साजरा करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी संविधान दिनाच...
मुंबई दि.२६ : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संविधानदिन साजरा करण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी संविधान दिनाचे महात्म्य विषद करताना म्हटले आहे,आपल्या सर्वोच्च संविधानाचे सदैव स्मरण ठेवून जगासमोर लोकशाहीचा आदर्श निर्माण करू! सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीही म्हटले आहे, आपले संविधान म्हणजे लोक शाहीचा आत्मा आहे!
दरम्यान परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयात संविधान दिन संपन्न झाला.खजिनदार निवृत्ती देसाई यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुढे बोलताना सांगितले,आपले संविधान ख-या अर्थाने आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.या प्रसंगी थोर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूण्यस्मृतिंना उजाळा देण्यात आला. उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण आदीनी आपले विचार व्यक्त केले.****

COMMENTS