सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठिक ७-३० वाजता सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कामत साहेब यांची भेट घेऊन, नवीन कमीटीची ओळख व जेष्ठांच्या समस्या संबधी सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री. मारुती कदम, उपाध्यक्ष श्री.विठ्ठल गव्हाणे, सचिव श्री. राजाराम खैरनार, माजी अध्यक्ष श्री. राम काजरोलकर, श्री,बळवंत पाटील .श्री बारवाल. श्रीमती शहा मॕडम उपस्थित होते. सर्वाचे मनोगत ऐकूण श्री. कामत साहेबांनी सांगीतले की, ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या सोडविण्यास आमचा सर्व पोलिस कर्मचारी वर्ग सहकार्य करेल. आपल्याला जेव्हा गरज भासेल तेव्हा ११२ मोबाईल क्रमांक फिरवा, पोलीस तुमच्या मदतीला हजर असतील, तसेच यापुढे ज्येष्ठांच्या समस्या प्रत्येक महिन्यात संघाच्या कार्यालयात मिटिंग घेवून सोडविल्या जातील. आपण सर्वांनी सहकार्य करा. सर्व पोलिस कर्मचारी आपणास मदत करतील. असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कामत साहेब यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS