प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे लायसन्स क्लबवर शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून 1 लाख 47 हजारांचा मुद्देमालसहीत 16 आरोपींना अटक केली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दोस्ती मित्र मंडळ चारीटेबल च्या नावाने लायसन्स धारी जुगार अड्डे सुरू झाले आहेत. लायसन्स च्या नावाखाली नियमबाह्य क्लब चालविल्यास कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी दिली आहे.शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती वरून हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आडगाव रंजे झिरो फाटा ते हिंगोली रोडवर दर्शना बार समोरील रूममध्ये लायसन्स जुगार अड्डा नियमबाह्य पणे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय , सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब, घेवारे, हट्टा चे ठाणेदार बोराटे यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सोळा जुगारी ताब्यात घेतले. सदर जुगारी परभणी, वसमत,पुर्णा येथुन जुगार खेळण्यासाठी सदर क्लबवर येत होती. त्यांच्याकडून रोख रक्कम 55 हजा 650 व मोबाईल असा एकूण 1 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात लायसन्स धारी जुगार अड्डे सुरू असुन पोलिसांच्या कारवाईमुळे लायसन्स धारी जुगार अड्डे चालवणारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर क्लब चालकाकडे कुठलेही कागदपत्रे व सभासद नोंदणी नव्हती व लायसन्स धारी क्लबवर फक्त रम्मी खेळण्यासाठी परवानगी असते, नगदी पैशा ऐवजी प्लास्टिक coin चा वापर केला जातो. मात्र या लायसन्स धारी क्लबवर सर्व नियम धाब्यावर बसवून तीरट नावाचा जुगार खेळल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असुन लायसन्स च्या नावाखाली असा नियमबाह्य पणे जुगार अड्डा चालविल्यास धडक कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी ग्लोबल मराठवाडा प्रतिनिधी शी बोलतांना दिली आहे.

COMMENTS