प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवैध हातभट्टी दारू काढूण विक्री केल्याजाते यावर पोलिसांनी अनेकदा कारवाया केल्या.अनेक गावातील महिलांनी गावठी दारू काढणारे विरूद्ध आंदोलने केली मात्र अवैध हातभट्टी दारू बंद झाली नाही.मात्र आता हातभट्टी दारू काढणारेंना एक वर्षासाठी तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.कारण आता जिल्ह्यात दाखल झालेले सिंघम पोलिस अधीक्षक आयपीएस जी श्रिधर यांनी गुन्हेगारांना सळो की पळो करण्याचा विडा उचलला आहे. आणि गावठी दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीवर एनडिपिए अक्ट नुसार कारवाई केली असुन त्याला तुरूंगात पाठवले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ईतीहासात ही पहिलीच कारवाई आहे. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक जी श्रिधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी व अवैध धंदे चालवणारे विरूद्ध कडक कारवाई ची भुमीका घेऊन असे गुन्हे करणाऱ्यां विरूद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील संदीप गोवींद पवार परिसरात सतत गावठी हातभट्टी दारू काढूण विक्री करत असे व त्याच्यावर अनेक अवैध दारू विक्री चे गुन्हे आहेत. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करूनही महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 93 अन्वये दोन वेळेस प्रतिबंधात्मक कारवाई एक वेळेस कलम 56 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये हद्दपारी चार प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतरही सदर इसम अवैध दारू विक्री करतच होता. मानवी शरीरास हानिकारक ईथाईल अल्कोहोलचे मिश्रण असलेले हातभट्टी दारू विक्री व निर्मीती करीत असल्याने सदर प्रकरणी बाळापुर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी झोपडपट्टी , हातभट्टी वाले , औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्करी , अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार, करणारे व्यक्ती यांच्या विघातक क्रत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम 1981एनपीडीए अंतर्गत कारवाई बाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक जी श्रिधर यांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून सदर आरोपीस एनपिडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. सदर कारवाई ने हिंगोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS