नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघात बाळासाहेंबांची शिवसेना सानपाडा विभागाच्या सहकार्याने दिवंगत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त २० नोव्हेंबर २०२२ रोजी सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांना थंडीमध्ये वापरण्यासाठी सोलापुरी चादरीचे वाटप नवी मुंबई महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते व जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विजय चौगुले यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाला सहकार्य केले जाईल, तसेच आपले प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचे मी प्रयत्न करीन. याप्रसंगी बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते व नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन समितीचे सदस्य विसाजी लोके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सचिव राजाराम खैरनार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते गणेश पावगे यांनी केले. सुरवातीला प्रास्ताविक भाषण करून संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी आभार मानले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार विष्णुदास मुखेकर, सर्व पदाधिकारी, सहकारी आणि सानपाडा विभागातील सुर्यकांत झेंडें, रामचंद्र पाटील, उमेश लोहोट, मनोज भोईर, शुभम भालेराव, रवि ढोबळे, विकास गाढवे, अविनाश जाधव, सागर कदम, ओमी राणा आदी शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS