सुमरमॅक्स' टाळेबंदी विरूद्ध युनियन खंबीरपणे कामगारांच्या पाठीशी ठाम राहील! -सचिन अहिर

   मुंबई दिं.२२: ठाणे येथील ब्लेडचे उत्पादन करणाऱ्या सुपरमॅक्स कंपनीत काल व्यवस्थापनाने टाळेबंदीची नोटीस लावली. त्यामुळे कामगारांमध्ये चिंत...

   मुंबई दिं.२२: ठाणे येथील ब्लेडचे उत्पादन करणाऱ्या सुपरमॅक्स कंपनीत काल व्यवस्थापनाने टाळेबंदीची नोटीस लावली. त्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या विरुद्ध युनियनने ताबडतोबीने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून काहीही झाले तरी यूनियन खंबीरपणे कामगारांच्या पाठीशी उभी राहील,असा विश्वास युनियनचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केला आहे.टाळेबंदी बाबत कंपनीने सर्वस्व आपली जबाबदारी झटकून कामगारांवर टाकली आहे,हे चुकीचे आहे.ही गोष्ट युनियन न्यायालया पुढे आणील,असेही कामगार नेत्यांनी म्हटले आहे.  

  या प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दि‌.७/११/२०२२ रोजी युनियनने पत्र पाठवून संबंधितांची बैठक बोलावून तोंडगा काढावा,असा आग्रह करण्यात आला होता. त्यावर स्मारण पत्रही पाठविण्यात आले.परंतु अद्याप पर्यंत तरी तशी बैठक बोलावण्यात आलेली नाही.

   ठाण्यातील नावाजलेल्या सुपरमॅक्स कंपनीतील अंदाजे १३२० कामगारांचे सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ दहा वर्षापेक्ष अधिककाळ नेतृत्व करीत आहे. आता पर्यंत कामगारांनी उत्पादन क्षमता वाढवून कंपनीच्या प्रगतीला सर्वतोपरी सहकार्य केले आहे.तरी ही गेल्या दोन वर्षांपासून सुपरमॅक्स प्रा.लिमिटेड कंपनीची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. कंपनीवर आजची वेळ येऊ नये, यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांत अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी कमिटी सदस्यांसह व्यवस्थापना बरोबर २५ पेक्षा अधिक बैठका घेतल्या आहेत.परंतु व्यवस्थानाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही अथवा कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठी भविष्य कालीन योजना पुढे आणलेली नाही.

    व्यवस्थापनाने आर्थिक कारण पुढे करुन आधी उत्पादनास लाग णारा कच्चा माल आणला नाही.त्यामुळे कंपनी पूर्ववत चालत नव्हती. कामगारांचा गेल्या चार महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही आणि मागील बोनस ही देण्यात आलेला नाही.या विरोधात युनियनने औद्योगिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्यालयाने १०तारखेच्याआत संपूर्ण पगार देण्याचा आदेश दिला.त्याची अंमलब जावणी न झाल्याने युनियनने त्या विरुद्ध'क्रिमिनल केस दाखल केली आहे.

   या प्रश्नावर अलीकडेच १६/११/ २०२२ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त शिरिन लोखंडे यांच्या कार्यालयात व्यवस्थापन आणि युनियन प्रतिनिधी यांच्या बरोबर मिटिंग पार पडली.मिटिंगमध्ये येत्या दोन महिन्यांत कंपनीची हैद्राबाद येथील जमीन विकून,कामगारांचा एक महिन्याचा पगार आणि उर्वरित पैशातून कंपनी पूर्ववत सुरू करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले होते.परंतु त्या पर्यंयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी कंपनीने टाळे बंदीची नोटीस लावलीच कशी?असा सवाल अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला आहे. 

******

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group