सेलू ( ) परभणी जिल्हा सेपक टकरा असोसिएशन वतीने , जिल्हा ज्युनिअर निवड चाचणी स्पर्धा. महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशनच व जळगाव जिल्हा असोसिएशन वतीने २४ वी ज्युनिअर राज्य सेपक टकारा मुले/मुली गट अजिंक्यपद स्पर्धा जळगाव येथे आयोजन दि. 24 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत.
सदर स्पर्धेत परभणी जिल्ह्याचे मुले/ मुली संघ सहभागी होणार असून जिल्हा निवड चाचणी मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल , खंडोबा बाजार परभणी, येथे आयोजित करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त फुटबॉल खेळाडूंनी सहभाग घ्यावा. या नाविन्यपूर्ण खेळात चेंडू पायाने खेळला जातो.
जन्म ता. 01/01/2003 नंतर घा असावा,सोबत आधार कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो आणावे.
अधिक माहिती स्तव प्रा. मोहम्मद इकबाल ( 88881 15377) यांच्याशी संपर्क साधावा.
सदर निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन आ. मेघना दिदी साकोरे(बोर्डीकर), राजेंद्र लहाने, विजय कान्हेकर, राजेंद्र मुंढे,प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे,सतिश नावाडे, बाबासाहेब राखे, प्रकाश रैवंदळे , किशोर ढोके, मोहंमद तारेख, महंमद फजल, मोहंमद वखाज,यांनी केले आहे

COMMENTS