नवी मुंबईत सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात परिसरातील बालकांना लहानपणातच देशसेवेचे व सुरक्षेचे क्षिक्षण देण्याचे महान कार्य सानपाडा येथील रहिवासी सेवानिवृत्त सैनिक महेश नरवडे व त्यांचे कुटुंब करीत आहे. या बालसैनिक शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सोमनाथ वासकर व शाखाप्रमुख अजय पवार यांच्या हस्ते झाले.
नवी मुंबईतील सानपाडा येथील जयहिंद या संस्थेच्या वतीने कै. सिताराम मास्तर उद्यानात १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी सानपाडा, वाशी,जुईनगर,तुर्भे, नेरूळ या परिसरातील बालकांसाठी सैनिक व सुरक्षेचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला,याप्रसंगी पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, महात्मा फुले विद्यालय या संस्थेचे जनरल सेक्रेटरी गणपत वाफारे, दत्तात्रय कुरळे, गणेश हुले, बेलभंडारे, तेजाभाई, भरत खरात आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेक सोमनाथ वास्कर यांनी प्रथम बालकांना
शुभेछा देऊन आपल्या गौरवपर भाषणात सांगितले की, महेश नरवडे व त्यांचे कुटुंबीय देशसेेवेचे महान कार्य करीत आहेत, त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय चांगला उपक्रम आपण सानपाडा या ठिकाणी राबवित आहात. मुलांना चांगले संस्कार व देशप्रेम
देण्याचे चांगले कार्य आपल्या संस्थेमार्फत चालते, याचा आम्हाला अभिमान आहे. आपणाला केंव्हाही काही गरज लागली, तर आम्हाला जरूर सांगा. शाखाप्रमुख अजय पवार यांनी स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते मुलांना चॉकलेट वाटण्यात आल्या.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS