खेळात सहभागी होऊन आपले आरोग्य सुदृढ करावे:- सौ.अरुणा संगेवार
सेलू ( )
टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन,परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर दि. ३ ते ४ ऑक्टोबर दोन दिवशीय आयोजित करण्यात आले.
२४ व्या. राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा मारप्पा (तामिळनाडू) दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य संघास निरोप देऊन नगर परिषद सेलू वतीने राज्यातील २८ खेळाडू व ४ प्रशिक्षक यांना ट्रॅक सुट किट देण्यात आले. शिबीर समारोप कार्यक्रम दि.०४ आक्टोबर मंगळवार रोजी करण्यात आला याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सेलू सौ.अरुणा संगेवार म्हणाल्या
सेलू तालुका च्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील खेळाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न व्हावे ,ही खूपच अभिमानास्पद बाब आहे,सेलू हे जसे सांस्कृतिक शहर आहे तसेच ते एक क्रीडा संस्कृती जपणारे शहर असुन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक या खेळात सहभागी होऊन आपले आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया,प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सौ.अरणा संगेवार, नगरपरिषद सेलू मुख्याधिकारी देविदास जाधव, नूतन संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी,माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे मुख्याध्यापक नारायण सोळंके, राज्य सचिव गणेश माळवे,प्रा.नागेश कान्हेकर, राज्य सदस्य संजय ठाकरे, रामेश्वर कोरडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम चे प्रास्ताविक राज्य सचिव गणेश माळवे ,सुञसंचलन डॉ. काशीनाथ पल्लेवाड तर जिल्हा सचिव सतीश नावाडे यांनी आभार मानले .
महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल सबज्युनिअर मुली संघ:-: कर्णधार दिपाली देशमुख,समीक्षा कदम,स्नेहा थावरे, राधा वारुळे, महेक बागवान, साईसमीता जवळकर, प्रशिक्षिका: सौ.स्नेहा जाधव,
ज्युनिअर मुली संघ :- कर्णधार निता थावरे, प्रणिता तावरे, निकिता थावरे, अंकिता जाधव दुधाटे राणी,अव्हानी जाधव, प्रशिक्षिका: सौ. प्राची कडणे,संघ व्यवस्थापक : मंदार कुस्टे
सबजुनिअर मुले:
कर्णधार माळकर सार्थक ,
दुधाटे विशाल ,गायके उमेश
ठाकरे हिमांशू, गायकवाड अनिकेत ,गायके आर्यन
मिश्र दुहेरी गटात:-
सय्यद साद सादिक व वैष्णवी काकडे ,तर प्रशिक्षक:- सय्यद सिंकदर.
जुनिअर मुले :- कदम विठ्ठल
चुडावकर महेश ,थावरे गोविंद
थावरे हर्षवर्धन ,परीयार आयुष
पवार शुभम , मिश्र दुहेरीत:- जान्हवी रावल व यादव अविंनीश प्रशिक्षक :-सतीश नावाडे
महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघास प्रथमोपचार पेटी शिवनारायण मालाची यांच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, प्रा. नागेश कान्हेकर, प्रा.के. के.कदम, गिरीष लोडाया, विरेश कडगे, अरुण रामपुरकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

COMMENTS