टेनिस व्हॉलीबॉल ने महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर नेले :- विनोद बोराडे
खेळातून भविष्य घडेल :- प्राचार्य डॉ.कोठेकर
सेलू ( ) मारप्पा (तामीळनाडू)येथे ता. ७ ते ९ आक्टोबर या कालावधीत संपन्न होणारया २४ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन नूतन चे संस्थाध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया यांच्या हस्ते सोमवार ता.०३आक्टोबर रोजी करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी,माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे मुख्याध्यापक नारायण सोळंके यांची उपस्थिती होती.
टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन,परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबीरात महाराष्ट्र राज्याच्या टेनिस व्हॉलीबॉल संघातील मुंबई, सोलापूर, बीड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा,हिंगोली, परभणी, जिल्ह्यातील २८ खेळाडूंचा समावेश आहे.
सदरील संघातील खेळाडू सेलू नूतन विद्यालय दि. ३ ते ४ ऑक्टोबर दोन दिवशीय राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर घेऊन २४ वी. राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा मारप्पा (तामिळनाडू) दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कार्यक्रम चे प्रास्ताविक राज्य सचिव गणेश माळवे ,सुञसंचलन डॉ. काशीनाथ पल्लेवाड तर जिल्हा सचिव सतीश नावाडे यांनी आभार मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, प्रा. नागेश कान्हेकर, प्रा.के. के.कदम, गिरीष लोडाया, सुनील गायकवाड यांचे
खेळातून भविष्य घडेल-प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर
( टेनिस व्हॉलीबॉल पूर्व प्रशिक्षण शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना डॉ कोठेकर म्हणाले की,या खेळाची निर्मिती अलीकडील काळात झालेली असली तरी,या खेळाने अल्पावधीतच राष्ट्रीय खेळांमध्ये स्थान मिळविले पुढील काळात ऑलिम्पिक मध्ये देखील स्थान मिळवेल असा विश्वास व्यक्त करून या खेळातून खेळाडूंचे भविष्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या अमृतमहोत्सवी प्रसंगी या खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड सरांना भेटण्याचा योग आला असाही उल्लेख केला.)
( टेनिस व्हॉलीबॉल या खेळाने महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर नेले.-विनोदराव बोराडे
सुरुवातीला या खेळाबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे हा खेळ अधिक लोकांना परिचयाचा नव्हता.परंतू अल्पावधीतच या खेळाने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले.त्यामुळे या खेळाने महाराष्ट्र चे नाव
जागतिक पातळीवर पोहोचले असे प्रतिपादन विनोद बोराडे यांनी केले.)


COMMENTS