नांदेड : महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित अनेक कार्यक्रमांची मेजवानी नंदेडकराना दिली आहे. या कार्यक्रमाची सांगता कविसंमेलनाने होणार...
नांदेड
: महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित अनेक कार्यक्रमांची मेजवानी नंदेडकराना दिली आहे. या कार्यक्रमाची सांगता कविसंमेलनाने होणार असून दिनांक १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुसुम सभागृहात काव्यकोजगिरी "चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ग्रामविकास व पंचायतीराज, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा युवक कल्याण तथा पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर सौ जयश्री निलेश पावडे राहणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.काव्यकोजागिरीत नामवंत कवी अरुण म्हात्रे, भरत दौंडकर आदी कवी आपल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा कायमस्वरूपी जपला आहे. संत ,महंत, विचारवंत ,कवी, साहित्यिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्याची ही सांस्कृतिक परंपरा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने जपली आहे. नांदेड महोत्सवासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून महानगरपालिकेने नांदेडकरांना सांस्कृतिक मेजवानी दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाची सांगता येत्या १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या काव्य कोजागिरी या सांस्कृतिक काव्य मैफिलिने होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांचा अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या काव्य कोजागिरी कविसंमेलनात असंख्य तरुणाईला वेड लावणारा 'उंच माझा झोका ' मालिकेसह अनेक चित्रपटातही गीत लिहिणारे कवी , गीतकार अरुण म्हात्रे, भरत दौंडकर यांच्यासह संजीवनी तदेगवकर,नितीन वरणकर, प्रभाकर साळेगावकर , पुरुषोत्तम सदाफुले, श्रद्धा बेलसरे, नारायण पुरी ,अशा पैठणी ,राजेंद्र वाघ, अशोक थोरात, अरुण पवार ,डि.के . शेख ,शंकर राठोड यांच्यासह भगवान अंजनीकर, रविचंद्र हडसनकर, वृषाली किन्हाळकर, श्रीनिवास मस्के , मनोज बोरगावकर , अमृत तेलंग , पी . विठ्ठल, अनुरत्न वाघमारे, महेश मोरे ,शिवा अंबुलगेकर ,अशोक कुबडे , शिवा कांबळे ,ज्योती कदम, जगन शेळके, करुणा जमदाडे , योगिनी पांडे, सातारकर ललिता शिंदे , सुजाता जोशी पाटोदेकर , व्यंकटेश चौधरी, वैजनाथ अनमुलवर , नागनाथ पाटील, सुचिता खल्लाळ, मिलिंद ढवळे ,शंकर वाडेवाले, नारायण शिंदे, अशोक कुमार दवणे, सदानंद सपकाळे आणि विजय बंडेवार या स्थानिक कवींच्या कवितांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.
या काव्य कोजागिरी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डी.पी. सावंत , माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर , खा. हेमंत पाटील, खा. सुधाकर शृंगारे , आ. सतीश चव्हाण ,, आ. विक्रम काळे, आ. अमरनाथ राजुरकर, आ. राम पाटील रातोळीकर , आ. मोहन हंबर्डे , आ. बालाजी कल्याणकर , आ. भीमराव केराम, आ. माधवराव पाटील जवळगावकर , आ. डॉक्टर तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापुरकर , उपमहापौर अ गफ्फार अ.सत्तार, सभागृह नेते महेश कनकदंडे, स्थाई समितीचे सभापती किशोर स्वामी, सभापती सौ अपर्णा ऋषिकेश नेरलकर , उपसभापती आयेशा बेगम शेख असलम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
कुसुम सभागृहात सायंकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या काव्य कोजागिरी या काव्य मैफिलीचा आनंद लुटण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे ,गिरीश कदम , उपायुक्त भरत राठोड ,निलेश सोनकेवार यांनी केले आहे.

COMMENTS