सेलू (. ) येथील फेंन्डस क्लब व्यायाम शाळेच्या उद्घाटन प्रसंगी साईबाबा बॅक चे अध्यक्ष हेमंतराव आडळकर म्हणाले की आपले जीवन आनंदमय व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे . आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी वेळ मिळत नाही. याकरिता सेलू शहरात फेंन्डस क्लब ने व्यायाम शाळेची उद्घाटन करण्यात आले असून यांचा आपण सदस्य व तरुण युवकांनी यांचा फायदा घ्यावा.
दि. ६ ऑक्टोबर रोजी फेन्डस क्लब व्यायाम शाळेचे उद्घाटन साईबाबा बॅक चे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी चंद्रकांत बोराडे, प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, राष्ट्रीय क्रिकेट पटू संदिप लहाने, उपाध्यक्ष ओमप्रकाश तोषणीवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
फेन्ड्स क्लब वतीने टेबल टेनिस, बॉल बॅडमिंटन, व्हॉलीबॉल खेळांचे मैदाने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी फेंन्डस क्लब चे सदस्य राजेश गुप्ता यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , राष्ट्रीय योगासन प्रशिक्षक डी.डी.सोन्नेकर, क्रिकेट स्पर्धा संयोजक गिरीश लोडाया, टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र राज्य सचिव गणेश माळवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम चे प्रास्ताविक निजलिंग आप्पा तरवडगे, सुञसंचलन रवि कुलकर्णी, तर आभार प्रदर्शन पांडुरंग ढवळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेंद्र गिल्डा, ओमप्रकाश तोषणीवाल, राजेंद्र महाजन, जुगलकिशोर बाहेती, फोफसे यांनी परीश्रम घेतले


COMMENTS