नांदेड, दि.७ (प्रतिनिधी) – समाजसेवेत नेहमी अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन परिवाराच्या वतीने आज पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष राजश्री पाटील यांनी दिली.
गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील नऊ वर्षापासून गोदावरी अर्बन परिवाराच्या माध्यमातून पुरग्रस्ताना तातडीची मदत, गटाई कामगार छत्रीचे वाटप, शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांना सनकोटची भेट, अंध मुलांच्या शाला - महाविद्यालयास गरजेनुसार अर्थिक व वस्तू स्वरुपात मदत, आनाथ मुलिंच्या वसतीगृहास मदत, तीर्थस्थळावर भाविकांची सेवा अशा विविध माध्यातून सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
एखाद्या आजारी किंवा रस्ते आपघातात गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीस तातडीने रक्ताची गरज असते. परंतू अनेक वेळा प्रयत्न करुन देखील वेळेवर हव्या त्या गटाचे रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे केवळ त्या गटाचे रक्त न मिळाल्याने त्या व्यक्तीस जिवनास मुकावे लागते. रोज किती तरी रस्ते अपघातात मृत्यू होतात. ही वाईट घटना मनाला वेदना देणारी असते. दरवर्षाप्रमाणे यंदा गोदावरी अर्बन परिवाराने संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा, अध्रप्रदेश, कर्नाटक, विदर्भ या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये एकाच दिवशी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक व्हावे यासाठी गोदावरी परिवारातील प्रत्येक सदस्यांचा प्रयत्न असणार आहे. अशी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.
गोदावरी अर्बनच्या वतीने कुठलाही उपक्रम हाती घेताना त्यात सर्व परिवाराच्या सद्स्यांचा शंभर टक्के सरहभाग असतोच. गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये राबविल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरात अधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, पिग्मी एजंट, महिला बचत गटांच्या महिलांसह सर्व सामान्य नागरीकांना देखील सहभाग घेता येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून एकुण ठेविदारांच्या संख्येच्या दुप्पट रक्त पिशव्यांचे संकलीत करण्याचा माणस आहे.
-राजश्री पाटील (अध्यक्ष गोदावरी समुह, नांदेड.)
COMMENTS