भोकर:(प्रतिनिधी) स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत जावे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न साकार व्हावे यासाठी के...
भोकर:(प्रतिनिधी) स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत जावे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु केले असून स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१-२२ चा भोकर नगरपरिषदेला राज्यातून सातवा तर मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळाला. १ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत फास्ट मुविंग सिटी इन २५-५० हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी २०१६-१७ पासून स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले असून स्वच्छतेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१-२२ मध्ये भोकर नगर परिषदेचा राज्यातून ७ वा क्रमांक तर मराठवाड्यातून प्रथम क्रमांक आला आहे. सदर पुरस्काराचे वितरण १ ऑक्टोबर २०२२ रोजी कोटरा स्टेडियम नवी दिल्ली येथे देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे मुख्याधिकारी सौ. प्रियांका टोंगे, इंजि. माधव जमदाडे, समन्वयक किशोर राठोड यांना केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहर विकास मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातून प्रथमच हा पुरस्कार मिळाला असून भोकर नगर परिषदेने केलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे.माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण मंत्रालयातील अवर सचिव राजेंद्र खंदारे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक, पत्रकार अहमदभाई करखेलीकर व पत्रकार अमोल पोलादवार व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS