स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात...
स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामापासून मुक्त केला. म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला.या निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ' मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला.
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ.संदीप कुमार लठ यांनी स्वामी रामानंद तीर्थ व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ.संदीप कुमार लठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना देण्यात आली.
ध्वजारोहणानंतर सांस्कतिक कार्यक्रमाअंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्व सांगून मराठवाडा गौरव गीताचे गायन झाले.या प्रसंगी पोदार शाळेचे शैक्षणिक सल्लागार मा. एन.जी.कांबळे यांनी आपले या लढ्या संधर्भातील आपले अनुभव सांगून आपल्या शब्दातून त्या काळचा इतिहास उभा केला.
शेवटी प्राचार्य डॉ.संदीप कुमार लठ यांनी हा एक प्रेरणादायी इतिहास आहे. त्याचा बारकाईने अभ्यास करुन त्यापासून भविष्यात सर्जनशील कृती करण्याची गरज आहे. केवळ स्मरणरंजनात न जाता आपल्या हातून भरीव कामगिरी कशी होईल याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे आहे.असे आपल्या मनोगतातून मांडलेल्या प्रेरक विचाराने उपस्थितांना संबोधित केले.

COMMENTS