स्पर्धा परीक्षेबाबत 'बिहारी ' मानसिकता तयार करता येईल का? -डॉ.संजय देऊळगावकर

नांदेड:(दि.१७ सप्टेंबर २०२२)             साधारणतः विद्यार्थी हा आपल्या करिअरबद्दल गंभीर नसतो; शक्यतो तो वाऱ्याच्या दिशेप्रमाणे वाहत जातो. मा...

नांदेड:(दि.१७ सप्टेंबर २०२२) 

           साधारणतः विद्यार्थी हा आपल्या करिअरबद्दल गंभीर नसतो; शक्यतो तो वाऱ्याच्या दिशेप्रमाणे वाहत जातो. मात्र सध्या काळात पराकोटीची स्पर्धा असल्यामुळे नियोजनबद्ध प्रयत्न, सकारात्मक विचार व निवडलेल्या क्षेत्रामध्ये कौशल्य व गुणवत्ता धारण केल्यास निश्चितच भविष्य आशादायक आहे. सध्याच्या काळात सूक्ष्म विशेषीकरण झालेले आहे. स्पर्धा परीक्षेबाबत 'बिहारी ' युवकासारखी मराठी तरुणांची मानसिकता तयार करता येईल का, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय देऊळगावकर यांनी व्यक्त केली.
           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पदव्युत्तर इंग्रजी विभाग व संशोधन केंद्राद्वारे 'मानव्य विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी' या विषयावर आयोजित इंडक्शन प्रोग्राममध्ये ते बोलत होते.
           स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
           याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव यांची उपस्थिती होती
          प्रारंभी प्रास्ताविक डॉ. एल.व्ही. पदमाराणी राव यांनी केले. याप्रसंगी डॉ.अजय गव्हाणे यांनी समायोचित अध्यक्षीय समारोप केला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चेतन देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सूर्यवंशी, प्रा. माधव दुधाटे, प्रा.सरकाळे, प्रशांत मुंगल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सामाजिक शास्त्रे विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel