नायगाव प्रतिनिधी : राजकीय वैमनस्यातून घुंगराळा येथील महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना येथील बालाजी मातावाड व नागोराव दंडेवाड या दोघां...
नायगाव प्रतिनिधी :
राजकीय वैमनस्यातून घुंगराळा येथील महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना येथील बालाजी मातावाड व नागोराव दंडेवाड या दोघांनी अश्लील भाषेत शिविगाळ करत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली यात महिला सरपंच जखमी झाल्या असून दि.२९ सप्टेंबर रोजी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
घुंगराळा ग्राम पंचायत निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातून निवडणूक आलेल्या राधाबाई जोगेवार ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्याने विरोधकांनी सतत त्रास देत विकास कामात अडथळे आणत होते यावरही मात करत सरपंचांनी काम करण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधकांकडून थेट घरात घुसून मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार घुंगराळ्यात घडल्यामुळे खळबळ उडाली असून राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे यामुळे तक्रारी वरुन एकमेकांविरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कुंटूर पोलीस ठाण्याचे सोनी महादेव पुरी हे करित आहे

COMMENTS