नांदड, दि. १७ (प्रतिनिधी) – भारत स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आय...
नांदड, दि. १७ (प्रतिनिधी) – भारत स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा” फडकवण्याचे भारतीयांना आवहन केले होते. त्या पाठोपाठ राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवहन केले होते. त्यास गोदावरी अर्बनच्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत गायन करुन प्रतिसाद देण्यात आला.
गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील व गोदावरी अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता तरोडा नाका परिसरातील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयात मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील यांच्या उपस्थितीत सामुहीक राष्ट्रगीत गायन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवहनास प्रतिसाद देण्यात आला. याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या मुख्यालय व मुख्यशाखेतील अधिकारी, कर्मचारी ,ग्राहक ठेविदार आणि सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

COMMENTS