नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड व उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन रेबीजमुक्ती मोहिमेंतर्गत पाळीव श्र्वानासाठी मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचा शुभारंभ सकाळी ९.०० वाजता मा.महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांच्या शुभहस्ते व उपमहापौर अ.गफ्फार अ.सत्तार, उपायुक्त (प्रशासन तथा आरोग्य)
डॉ पंजाबराव खानसोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मा.महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांनी महापालिकेच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राण्यांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हानं केले.
महापालिकेच्या या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरात जवळपास ५० पाळीव श्र्वानाना मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
*यावेळी अंधारात चमकणारा रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लसिकराणासाठी आलेल्या प्राण्यांच्या गळ्यात बांधण्यात आला*.या बेल्ट मुळे रात्रीच्या वेळी अपघात मुळे होणारी प्राण्यांचे मृत्यू टाळता येतील..
यावेळी मनपाचे पशू शल्य चिकित्सक डॉ रईसोद्दीन, सहाय्यक आयुक्त रमेश चवरे, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन चे दगडु लोंढे, प्रवीण जाधव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
प्रिय संपादक सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात विनामूल्य प्रकाशित करावी हि विनंती
जनसंपर्क विभाग मनपा नांदेड

COMMENTS