स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सद्भावना दिवसानिमित्त गुरुवार, दि.१८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस चंदन पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये सद्भावनेची शपथ दिली.
“मी, अशी प्रतिज्ञा करतो/करते की, जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून संविधानिक मार्गानी सोडविन” अशी प्रतिज्ञा देण्यात आली.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दिपक बच्चेवार, अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, प्र.वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS