नवी मुंबईत सानपाडा येथे गेली अनेक वर्षे बालगोपाळ मित्र मंडळातर्फे दही हंडी उत्सव साजरा केला जातो, गेली दोन वर्षे कोव्हीडमुळे दही हंडी उत्सव साजरा करता आला नाही, मात्र यावर्षी सरकारने सर्व निर्बंध उठविल्यामुळे दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरकारने या खेळाला मान्यता दिल्यामुळे भविष्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल.
सानपाडा येथील बालगोपाळ मित्र मंडळातर्फे नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख श्री. मिलिंद सूर्यराव, शिवसेना शाखाप्रमुख श्री. अजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी संत गाडगे महाराज मैदानात दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री विठ्ठल मोरे, नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर, शिवसेना शाखाप्रमुख श्री. बाबाजी इंदोरे, महिला आघाडी प्रमुख शुभांगी सूर्यराव, कार्यकर्ते सदाशिव तावडे, अशोक जाधव, अरविंद तावडे, दत्तात्रय कुरडे, रणवीर पाटील, विलासराव देशमुख, नरेश शर्मा, तेजा वाडेल, श्याम पवार, भाऊ गोडसे, नरेश देशमुख, विष्णुदास मुखेकर, अशोक सकपाळ, शिवाजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील अनेक गोविंदा पथके दही हंडी फोडण्यासाठी आली होती.


COMMENTS