सेलू जि.परभणी : पूज्य साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्टतर्फे 'वर्तमान समस्या सोडविण्यासाठी महात्मा गांधी मार्गाची उपयुक्तता ' या विषयावर राष्ट्रीय स्तरावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती परभणी जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी दिली.
स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वय व भाषेचे बंधन नाही. शब्द मर्यादा किमान ७०० ते कमाल २५०० शब्द आहे. विजेत्यांना जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. टाईप अथवा हस्तलिखित निबंध १५ सप्टेंबरपर्यंत पोस्टाने; तसेच 9881525510 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन पाठवावेत, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.सदाविजय आर्य, सरचिटणीस अमर हबीब, जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी केले आहे.
जिल्हा व राष्ट्रीय पारितोषिक
विजेत्यांना परभणी जिल्हास्तरावर प्रथम : रोख दोन हजार रुपये, द्वितीय : दीड हजार रुपये, तृतीय : एक हजार रुपये, राष्ट्रीयस्तरावर प्रथम : रोख दहा हजार रुपये, द्वितीय : सात हजार रुपये, तृतीय : तीन हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

COMMENTS