*गंगाखेड (प्रतिनिधी )*
शहरातील सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले. तर दिनांक 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषण सादर केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, उपमुख्याध्यापक छाया घोळवे, पर्यवेक्षक रमेश गिराम, शिक्षक आघाडीचे गोपाळ मंत्री, सांस्कृतिक विभागाचे अनंत काळे,आलापुरे, घुगे, मठपती,मुधोळकर ,संगेवार, वाघमारे, राजूरकर ,लोंढे, बोरीकर, लव्हाळे, घोगरे, तम्मेवार, साळवे, कातकडे, पाठक, निरस ,महाजन, सातपुते ,कुलकर्णी ,कंधारकर, मिसाळ, वाडकर ,जोशी, दासरवाड ,पाटील, जगतकर,सुगावकर, भालेराव सह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


COMMENTS